पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६९ )

असतां मधून मधून दुःखावेगानें त्यांचा कंठ भरून येई व त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा चालत. केसरींतील तो मृत्युलेख अंतःकरणाच्या कळवळ्यावरण उचंबळत असतांना लिहिला असल्यामुळे सर्व मृत्युलेखांत तोच उत्तम वठला आहे. अजूनही इतक्या वर्षांनीं कोणी तो वाचला तरी वाचकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहूं लागल्याशिवाय रहाणार नाहींत. धन्य ते आगरकर ! व धन्य ते टिळक ! बाळांनों, मित्र असावे तर असे असावे. प्रि. आगरकरांची मृत्यूची बातमी सर्व देशभर पसरली व बहुतेक सर्व वर्तमानपत्रांनी काळ्या रेघांनी वर्तमानपर्ने छापून दुःखानें व प्रेमानें आगरकरांच्या निरनिराळ्या गुणांचें वर्णन केलें. सर्व पत्रांनी असा स्वार्थत्यागी कर्मवीर आजपर्यंत झाला नाहीं असे उद्गार काढले.

प्रि. आगरकरांचा स्वभाव.

 प्रि. आगरकरांचा स्वभाव सरळ व मोकळा असे. एक आंत व एक बाहेर असें त्यांचें कधीही नस. जीं मतें ते प्रतिपादीत ती ते आपल्या आचरणांतही आणीत असत. त्यांना दांभिकपणाची फार चीड असे. दांभिक माणसावर ते जोराचे तडाके उडवीत असत. एरवीं त्यांचा स्वभाव मोठा विनोदी व थट्टेखोर असे. मंडळींत आगरकर असले म्हणजे हास्यरसाला कधीही कमताई नसावयाची. इतकी दम्याची ब्यथा जडली होती तरी ते नेहमी आनंदी असत. ते कोणाचाही द्वेष करीत नसत. लो. टिळक व प्रि. आगरकर यांचे वर्तमानपत्रांत पुष्कळ वेळां दोन हात होत असत. परंतु यामुळे त्यांच्या कॉलेजमधल्या जडलेल्या मैत्रीमध्यें व प्रेमामध्यें मुळींच अंतर पडलें नाहीं. टिळक व आगरकर यांना मालाकार हे माझे बाळगोपाळ आहेत असें प्रेमानें म्हणत असत. अशा बंधूंप्रमाणे वागणाच्या बाळगोपाळांचें प्रेम अखेरपर्यंत अगर्दी अकृत्रिम होतें. प्रि. आगरकर हे मोठे बाणेदार होते. त्यांच्या बाणेदारपणाचें व तेजस्वितेचें उदाहरण मार्गे दिलेंच आहे. गोपाळरावजी