पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६८)

 १० शास्त्रीय व औद्योगिक शिक्षणाचा प्रसार करावा.
 हीं आणि अशींच नवीन मर्ते लोकांनी शिकविण्याचा प्रयत्न प्रि. आगरकरांनी आपल्या सुधारक पत्रांतून केला व त्यावेळीं जरी हीं मत लोकांना सर्वस्वी पटलीं नाहींत तरी त्यांपैकी बरीच मतें आतां लोकांना मान्य झाली आहेत व त्याप्रमाणे लोक वागूही लागले आहेत.
 प्रि. गोपाळराव यांना कॉलजचें व सुधारक पत्राचें मिळून फारच काम पडत असे. त्यांना विद्यार्थिदशेतच दम्याची व्यथा जडली होती. यामुळे त्यांची प्रकृति अशक्त झाली होती. त्यांत प्रि. आपटे व प्रो. वासुदेवराव केळकर यांच्या अकाली मृत्यूनें त्यांना मोठाच धक्का बसला व आतां प्रि. आपट्यांच्या मागून ते प्रिन्सिपाल झाल्यामुळे त्यांच्यावर कामाचा बोजा अतोनात पडला. यामुळे त्यांची प्रकृति अधिकच खालावली.
 सन १८९५ च्या मार्च महिन्यांत गोपाळराव फर्ग्युसन कॉलेजाचे कंपौंडांत प्रिन्सिपालसाठी बांधलेल्या बंगल्यांत रहावयास गेले. १८९५ सालीं त्यांची प्रकृति अधिकाधिक बिघडतच गेली. शेवटीं ता. १६ जून १८९५ या दिवशी त्यांना अतिशय वेदना झाल्या. त्या रात्रीं त्यांना मुळींच झोंप आली नाहीं. ता. १७ जूनच्या पहाटेस 'मला आतां जरा बरें वाटतें, मी निजतों व तुम्हीही निजा,' असें म्हणून ते जे निजले ते पुनः उठले नाहीत. अशा त-हेनें या अद्वितीय सत्यप्रिय स्वार्थत्यागी लोककल्याणकर्त्यांचा अंत झाला. प्रि. गोपाळराव आगरकर यांच्या मृत्यूची बातमी हां हां म्हणतां सर्व पुणे शहरभर पसरली. खरा देशसेवक, सत्यवादी, स्पष्टवक्ता, सुशील समाजदुधारक, गरिबीत जन्मून गरिबति सर्व आयुष्य देशासाठी खर्च करून गरिबींत मरण पावला असें म्हणत व त्यांचे अनेक गुण आठवीत हजारों लोक त्यांच्या प्रेतयात्रेंत सामील झाले. लो. टिळकांच्या दुःखास तर पारावार उरला नाहीं. आपला सख्खा प्रेमळ वडील बंधु मरण पावला असे त्यांना वाटलें. अर्से म्हणतात की, प्रि. आगरकरांचा मृत्युलेख 'केसरी' पत्रासाठी लिहीत