पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६६)

 तुरुंगांतून सुटून आल्यावर आगरकर, टिळक, वामनराव आपढे, नामजोशी वगैरे मंडळींनी फर्ग्युसन कॉलेज काढलें; आणि न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्यूसन कॉलेज उत्तम तऱ्हेनें चालविण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी नांवाच्या मंडळीची स्थापना केली. अशा प्रकारें झपाट्याने सर्व कामे या मंडळीनों उत्तम प्रकारें चालू ठेवलीं. कै० वामनराव आपटे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्रिन्सिपॉल झाले. त्यांनी आपल्या विद्वत्तेने व शिस्तीनें कॉलेज व शाळा भरभराटीला आणली. आगरकरांनीं व टिळकांनीं वरील दोन पवें लोकप्रिय व वजनदार बनविलीं.
 अर्से सर्व ठीक चाललें असतां कांहीं सामाजिक प्रश्नांवर आगरकर व टिळक यांचा मतभेद झाला. आगरकरांना वाटे उत्तम गोष्ट आपण स्वतः आपल्या वर्तनांत उतरवावी व उच्च ठिकाणी उभे राहून लोकांना उपदेश करून त्या उत्तम स्थितीकडे येण्यास सांगावें. प्रथम आपण करतों ती गोष्ट लोकांना आवडणार नाहीं, पण काही काळाने लोक आपल्या मताला येऊन मिळतील. टिळकांना वाटे एकादी गोष्ट उत्तम आहे असे जरी आपले मत असले तरी लोकांना ती गोष्ट पसंत नसेल तर लोकांना टाकून आपण एकटेच शिखरावर जाऊन बसूं नये. तर आपली उत्तम गोष्ट पुनः पुनः लोकांना सांगून, आपणांविषय त्यांच्यांत प्रेम उत्पन्न करून आपल्या मताप्रमाणे त्यांना हळूहळू वाटावयाला लावून त्यांना घेऊनच आपण पुढे जावें. मग यामुळे आपणांला अगदी मंद गतीनें जावें लागले तरी हरकत नाहीं. या दोनही थोर पुरुषांचा हेतु एकच. तो हा कीं, लोकांना पुढे पुढे उन्नतीच्या मार्गानें न्यावयाचें पण दोघांच्या पद्धति भिन्न. यामुळे या दोघांना एकत्र काम करणे अशक्य झाले. यामुळे आगरकरांनीं 'केसरी' पत्राचा संबंध सोडून दिला व सन १८८८ पासून आपली मतें पसरावेण्यासाठी सुधारक पत्र काढले व तें मरेपर्यंत उत्तम तऱ्हेनें चालविलें.