Jump to content

पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

VERNACULAR अजरामर झालेले महाराष्ट्राचे पंचप्राण. ल रण हितगुज. 6 बाळांनों, आज बरेच दिवस तुमचा नाद चालला आहे, की 'राम च कृष्ण' यांची चरित्रे आम्हीं वाचलीं ती आम्हांला फार आवडली. तशींच आजकालच्या थोर पुरुषांचीं चरित्रें' आम्हांला सांगाना ? हा तुमचा नाद कांहीं वावगा नाहीं. पुराणकाळासारख्या हजारों वर्षीच्या पूर्वी होऊन गेलेल्या थोर पुरुषांची चरित्रे वाचलीं म्हणजे सहजच वाटतें, कीं हल्लींच्या काळीं अर्शी थोर माणसें असतील का ? अशीं थोर माणसें हल्लीं आहेत असें कोणी सांगितल्यास मनाला फार आनंद होतो व वाटतें, की आपणही रामलक्ष्मणाप्रमाणें होऊं या. तसें होगें अगदीच कांहीं अशक्य नाहीं. कारण तसली माणसें हल्लीं देखील झालेली आहेत. बाळांनों, खरोखरच प्राचीन काळच्या थोर माणसांसारखी थोर माणसें हल्लींही देवाच्या दयेनें आपणांत उत्पन्न झाली आहेत, त्यांना आपल्या थोर गुणांनीं व सत्कृत्यांनी मोठी कीर्ति मिळविली आहे, आपले नांव अजरामर व पवित्र करून ठेविले आहे, आपले सर्व आयुष्य देशाच्या सेवेंत खर्चिलें आहे. त्यांनी देशसेवेंत आपला देह झिजविला आहे व अशा तऱ्हेनें आपण जे त्यांचे देशबंधू त्या आपल मनें त्यांनी आपलीशीं करून घेतलीं आहेत. या असल्या " आजकालच्या थोर माणसांनी आपलीं नाशवंत शरीरें टाकून दिली आहेत व हल्लों ते आपल्या सर्वांच्या SOCIE