पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५८)

रलें. एखादा कच्च्या धीराचा मुलगा असता तर या निराशेनें त्याची कंबरच खचून गेली असती. पण आमचे गोपाळराव इतक्या कोवळ्या त्रयांतही पक्के हिंमतबहाद्दर होते. त्यांनी लगेच मधुकरी मागण्याचें किंवा वार लावण्याचे ठरविलें व शाळेचे खर्चाकरितां लोकांकडे शा गिर्दी करण्याचे ठरविलें. इतकें गोपाळरावांनीं केलें खरें, पण लोकांची नोकरी करून बिचाऱ्यांना अभ्यास करावयास मुळींच वेळ मिळेनासा झाला. यामुळे कऱ्हाडाहून रत्नागिरीस म्हणजे आगींतून फोफाट्यांत पडल्यासारखें त्यांना झालें. शेवटी नाइलाज होऊन ते रत्नागिरीहून कऱ्हाडास परत आले.

पूर्वी कारकून तर आतां काम्पौंडर.

 गरीबी मनुष्याला काय करावयाला लावील व किती वाकवील याचा कांहीं नेम नाहीं. मुनसफकोर्टातील खर्डेघांशीचे सुख गोपाळरावांनी पूर्वी अनुभविलेच होतें. यामुळे खर्डेघांशींत पुन: ते पडले नाहींत शिवाय जन्मभर नोकरीत रहाण्याचा त्यांचा विचार नव्हता, म्हणून कांहीं दिवसांपुरते कांपौंडर बनले. तरी आपणांला पुढे शिकावयाचें हा आपला निश्चय त्यांनी सोडला नाही. दैव तरी हात धुवून पाठीस लागून मनुष्याची परीक्षा पहातें. पण एकदां तें मनुष्य दैवाच्या परीक्षेत उतरलें म्हणजे तेंच विरोधी दैव अनुकूल होतें. तसेंच कांहींसें गोपाळरावांच्या बाबतीत झालें. दैव त्यांना आतां अनुकूल झाले. त्यांचे थोरले मामा वहाडांत अकोला या शहरी होते. त्यांनी तेथील हायस्कुलांत अभ्यास करण्यासाठी आपला भाऊ दत्तोपत व आपला भाचा म्हणजे आपले गोपाळराव यांना बोलावले. झालं. आतां गोपाळरावांचे मॅ ट्रिकपर्यंतचें शिक्षण निर्विघ्नपणे होणार अशी त्यांना खात्री वाटली व फार आनंद झाला.

अकोल्यांतील आनंदाचा काळ.

 अशा तऱ्हेनें अचानक दैव अनुकूल होऊन गोपाळरावांना आपले मामा व जिवलग मित्र दत्तोपंत यांचेबरोबर आपले थोरले मामा