पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५७)

किती तरी हुशार मुलांच्या हुशारीचें हिनें मातेरें केलें जाहे, किती तरी हुशार व महत्वाकांक्षी मुलांना निव्वळ खर्डेघांशे बनविलें आहे, किती तरी चलाख व पाणीदार बाळकांना नाउमेद करून टाकले आहे. असल्या या दुष्ट गरीबीनें प्रथम गोपाळरावांनाही आपला इंगा चांगलाच दाखवला. त्यांचे सोबती पुण्यास शिकण्यास गेले. या बयाबाईनें बिचाऱ्या गोपाळरावांना नाउमेद करून केवळ आपल्या तेराव्या वर्षी कऱ्हाडच्या मुनसफकोर्टात खर्डेघांशी कारकून बनविलें. एखादा लेंचापेंचा मुलगा असता तर गरीबीनें त्याला जन्मभर खर्डेघांशातच डांबून ठेवलें असतें. पण आमचे गोपाळराव कांही असे कच्चचा दमाचे नव्हते. ते निश्चयी व धाडशी होते. त्यांनी इतरांप्रमाणें गरीबीपुढें वांकण्याचें साफ नाकारले. इतकेंच नव्हे तर त्या गरीबीलाच आपल्यापुढे वांकवून आपण आपली महत्वाकांक्षा पूर्ण करून घ्यावयाची असा त्यांनीं पक्का निश्चय केला.

कऱ्हाडाहून रत्नागिरीस

 मुनसफ कोर्टात खर्डे घांशीत असतां गोपाळरावांना आपल एक नातेवाईक रत्नागिरीस आहेत असे समजलें. लागलीच स्वारीनें रत्नागिरीस जाऊन तेथील हॉयस्कुलांतून मॅट्रिक होण्याचा निश्चय केला. हा त्यांचा धाडसी निश्चय पाहून त्यांचे मुनसफ रा. सा. नागपूरकर यांना मोठें कौतुक वाटले व त्यांनी मदतीदाखल या वीरबाळाला ७५ रुपये दिले. ते रुपये कंबरेला खोऊन गोपाळराव पायींच रत्नागिरीस जावयास निघाले.

आगीतून फोफाट्यांत.

 कऱ्हाडाहून रत्नागिरीस म्हणजे सुमारे दोनशें मैलांचा प्रवास. एवढा लांबचा प्रवास केवळ मनाच्या उत्सुकतेनें एवढ्या लहान वयांत गोपाळरावांनीं पायच केला. पण येथेही त्यांचें दुर्दैव त्यांच्या पाठोपाठ आलेंच. ते ज्या नातेवाईकाच्या भरंवशावर इतक्या दूर आले होते, त्यानें त्यांच्याकडे पाठ फिरविली व त्यांना आश्रय देण्याचें साफ नाका-