पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५६)

 गोपाळरावांचे शिकण्याचें वय झाले तेव्हां ते आपल्या आजोळी कऱ्हाडास गेले, कारण टॅभू येथें शिकण्याची मुळींच सोय नव्हती. कन्हाडास मराठी शाळा होती, व तेथे इंग्रजी शाळाही होती. पण त्या शाळेत इंग्रजी तीनच इयत्ता होत्या. गोपाळरावांचा अभ्यास कऱ्हाडास फार मजेनें झाला; याचे कारण त्यांच्याच वयाचे त्यांचे धाकटे मामा दत्तोपंत हे त्यांना फार चांगले सोबती मिळाले. या मामाभाच्यांचें एकमेकांवर फारच प्रेम होतें. असो. याप्रमाणे आनंदानें गोपाळरावांनीं आपला कऱ्हाडा येथें होण्यासारखा होता तेवढा अभ्यास आपल्या वयाच्या तेराव्या वर्षीच पुरा केला.

गोपाळरावांचा बालस्वभाव.

 गोपाळराव लहानपण निरोगी, चपळ, सशक्त व खेळांत फार पटाईत होते. चेंडू दांडू, आट्यापाट्या वगैरे धूमधडाक्याचे खेळ खेळून त्यांनी आपले शरीर धळकट बळकट व काटक बनविलें होतें. शिवाय अत्यंत आरोग्यदायक असा पोहण्याचा व्यायामही ते मनसोक्त घेत असत. पवित्र कृष्णानदी त्यांचे कन्हाडाजवळच असल्यामुळे त्यांची पोहण्याची चांगली सोय झाली होती.
 अशा तऱ्हेनें, अभ्यासानें त्यांनी आपले मन सुशिक्षित केलें व व्यायामानें शरीर पीळदार बनविलें, यामुळे ते नेहमी आनंदी व उल्हासी दिसत असत.

पुढे काय ?

 येथवर झालें तें सर्व ठीक झाले; पण ' पुढे काय ?' हा प्रश्न गरीब मुलांना कितीतरी वेळां त्रास देतो, तसा तो आतां गोपाळरावांना त्रास देऊं लागला. कऱ्हाडाच्या शाळेतील शिक्षण मिळविलें. आतां त्या पुढचें शिक्षण मिळविण्यासाठीं त्यांचे बरेच मित्र पुण्यास गेले. आपल्या गरीबीमुळे आपणांला जातां येत नाहीं हें मनांत येतांच गोपाळरावांच्या डोळ्यांतून टच्चदिशीं पाणी आलें. गरीबी मोठी कठीण आहे. आजपर्यंत