पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(५५)

अशा स्पष्टवक्त्या देशसेवकाचें चरित्रं बाळांनो आता तुम्हांला मी सांगणार असल्या अलौकिक गुणांनी भूषित झालेले गोपाळरावजी यांचा जन्म इ. स. १८५६ च्या जून महिन्यांत झाला. त्यांचा जन्म एका मोठ्या शहरांत झाला नाही. त्यांचा जन्म अतिशय लहान अशा टेंभूनांवाच्या खेड्यांत झाला. एवढ्या थोर पराक्रमी पुरुषाचा जन्म असल्या लहान खेड्यांत झाला, याचें बाळांनों तुम्हांला आश्चर्य वाटायला नको. मोठमोठाल्या नद्यांचा उगम जसा अगदी लहान आकुंचित स्थळीं होतो, तसा थोर पुरुषांचाही जन्म अगदी लहानशा खेड्यांतही कधीं कधीं होतो. त्यांचे हे जन्मगांव टेंभू सातारा जिल्ह्यांत कऱ्हाड जवळ आहे.

पूर्वजांची हकीकत.

 गोपाळरावांच्या पणजोबांचें नांव बच्चाजीपंत. हे चांगलें खाऊन पिऊन सुर्ख। होते. त्यांचे चिरंजीव विष्णुपंत यांचे कारकीदींतही या कुटुंबाची स्थिति साधारण होती. या विष्णुपंतांचे चिरंजीवांचें नांव गणेशपंत, हेच आपल्या चरित्रनायकांचे वडील. ह्यांचे कारकीर्दीत मात्र या कुटुंबाला अतिशय गरीबी आली. ह्यांचें लग्न टेंभू गांवालगतचे कऱ्हाड गांवच्या विष्णुपंत भागवत यांच्या ठकू नांवाच्या मुलीशीं झालें. ठक्कूताईचें सासरचें नांव सरस्वतीबाई असें होतें. बाळांनों, आलेना आतां लक्ष्यांत की गोपाळरावांच्या बापाचें नाव गणेशपंत व आईचे नांव सरस्वतीबाई. हीं दोघेही फार सज्जन व सुशील होतीं. दोघंही मोठीं देवभक्त होतीं. सरस्वतीबाईना देवावर सुंदर सुंदर गाणीं रचण्याचा व तीं आपल्या गोड आवाजाने म्हणण्याचा फार नाद असे गोपाळरावांना एकंदर पांच भावंडें होतीं. दोन भाऊ व तीन बहिणीगोपाळरावांचा जन्म झाला, तेव्हां त्यांच्या आईबापांची अगदर्दी अन्नान्नदशा झाली होती.
 गोपाळरावांचे आजोळ कन्हाडास होते. त्यांचे आजोळची स्थिति साधारण चांगली होती. यामुळे त्यांची आई मुलांना घेऊन कांहीं दिवस माहेरी रहावयास जात असे.