पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५२ )

करात नसत. असें जरी होतें तरी ते घरीं सर्व धर्मकर्मे जुन्या चालत आलेल्या संप्रदायाप्रमाणे करीत असत. म्हणजे जरी स्वतःचें एकेश्वरी मत असले तरी शेंकडों वर्षे आपल्या घराण्यांत शहाणे पूर्वज जें करीत आले ते आपल्या मनाला पटत नाहीं एवढ्यावर सर्व पूर्वजांना मूर्ख ठरवून आपल्या मनाप्रमाणे एकदम बदलायचें है त्यांना बरोबर वाटत नसे. म्हणूनच घरच्या घर्मपद्धतीत त्यांनी कांहीं बदल केला नाहीं.

विष्णुशास्त्री यांचीं शकुनभूतविषयक मतें.

 लोकभ्रम या विषयावर विष्णुशास्त्री यांनीं निबंधमालत एक निबंध लिहिला आहे. त्यांत भूत, पिशाच्च वगैरे सर्व खोट्या कल्पना आहेत अर्से विवेचन केलेले आहे. त्याच निबंधांत मांजर आडवें जाणे वगैरे ज्या अपशकुनांविषयीं कल्पना लोकांत पसरल्या आहेत त्या अगदीं वेडगळपणाच्या आहे असे त्यांनी दाखविले आहे.

विष्णुशास्त्रयांचें एकच व्यसन.

 विष्णुशास्त्री यांना कोणतेंही वाईट व्यसन नव्हतें. त्यांचे वेळच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर दारू, चिरूट, चहा या त्रिकुटांचा बराच अम्मल बसला होता. पण विष्णुशास्त्री यांना या व्यसनाचा विटाळही नव्हता. त्याचप्रमाणे त्यांनीं एकपत्नी व्रतही अत्यंत निश्चयानें पाळलें. हें सांगण्याचे कारण कीं, त्यांची बायको नेहमीं आजारी असे व पुष्कळ दिवस माहेरींच असे. तिच्यापासून त्यांना एकच मुलगी झाली व ती ५/६ दिवसांची होण्यापूर्वीच मेली. पुढे तिला मल झालें नाहीं. म्हणून विष्णुशास्त्री यांच्या आईनें त्यांना दुसरें लग्न करण्याविषयों अतिशय आग्रह केला. विष्णुशास्त्री आईचा फार मान ठेवीत व तिच्या आज्ञेत वागत; परंतु आईनें दुसरें लग्न करण्याची गोष्ट एक दोनदां काढली, त्यावर त्यांनी कांहींच उत्तर दिलें नाहीं. हेतु हा कीं, आईची अवज्ञा न व्हावी. परंतु पुनः तीच गोष्ट दुसऱ्याकडून आईनें त्यांच्याजवळ काढतांच त्यांना फार संताप आला व मला एक बायको .