पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५० )


प्रेतास अग्निसंस्कार.

 अकरा वाजतां विष्णुशास्त्री यांची प्रेतयात्रा डोलकर आळींतून नदीकडे निघाली. हजारों लोक एकसारखे अश्रु ढाळीत प्रेताबरोबर चालले होते. नदीवर प्रेत नेलें तेव्हां एवढें तें ओंकारेश्वराचें वाळवंट पण मंडळीनें अगदर्दी खचून भरलें होतें. विष्णुशास्त्रयांचें केवळ बत्तीस वर्षी- तील अलौकिक कृत्यांचें थोडक्यांत पण योग्य स्तुतीपर वर्णन रा० रामभाऊ साने यांनी केले. नंतर प्रेतास अग्नि देऊन खिन्न मनानें तो प्रचंड समाज परत फिरला.

विष्णुशास्त्री यांचा पोषाख.

 विष्णुशास्त्री अखेरपर्यंत अगदीं साधा पोषाख करीत असत. त्यांत हल्लीं झळकणारे प्रकार म्हणजे बूट, पाटलोण, नेकटाय, कॉलर वगैरे मुळींच नसत.

त्यांची आंगलट.

 विष्णुशास्त्री फार किडकिडीतही नव्हते व फार लवही नव्हते. त्यांचा चेहरा अगदर्दी ओबडधोबड होता. तो प्रथम दर्शनी मनांत भर- ण्यासारखा नव्हता. प्रथम पहाणारास हे प्रचंड बुद्धि व कर्तबगारी यांचें सागर असतील असा नुसता संशय देखील येत नसे.

शास्त्रीबोवांचा स्वभाव.

 शास्त्रीबोवा अबोल असत. वाटेल त्या माणसाबरोबर हवापा- ण्याच्या गप्पा कशा माराव्या हे त्यांना बिलकूल ठाऊक नव्हतें. हल्लोंच्या बहुतेक लोकांना ताजी गरमागरम बातमी वाचण्याची अतोनात आवड दिसून येते. व त्यामुळे सकाळी टाइम्स, क्रॉनिकल, लोकसंग्रह, ज्ञानप्र- काश, संदेश यांच्यावर त्यांच्या उड्या पढतात. पण विष्णुशास्त्रयांचें याच्या अगदर्दी उलट होतें. या गरमागरम बातम्यांची त्यांना मुळींच आवड नसे व एक दिवसांतच ज्या वर्तमानपत्रांचें महत्व नाहींसें व्हावयाचें व जीं दुसऱ्या दिवशीं केराच्या टोपलीला आलिंगन यावयाची असल्या वर्त-