पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४८)

निघाला. तो अतिशय भरभराटीस आला असून त्याचें काम हल्लीं वाफेच्या एंजिनावर चालतें.

न्यू किताबखाना.

 याच वेळीं 'न्यू किताबखाना' नांवाचें इंग्रजी, मराठी व संस्कृत पुस्तकें विकण्यासाठी विष्णुशास्त्र्यांनी एक दुकान काढले. तेही आज चांगल्या स्थितींत चालत आहे.
 अशा तऱ्हेनें निरनिराळे धंदे व संस्था काढून विष्णशास्त्री यांनी एक चांगला कित्ता तरुण सुशिक्षितांना घालून दिला. सुशिक्षितांना नोकरीवरच अवलंबून राहण्याचें कारण नाहीं. कोणताही धंदा काढून तो प्रामाणिकपणानें, मेहनतीने व मन लावून चालविल्यास त्यावर स्वतंत्रतेनें आपलें पोट भरतां येतें हैं विष्णुशास्त्री यांनी प्रत्यक्ष कृतीनें तरुण पिढीस दाखवून दिलें.

शास्त्रीबोवांचा अंत.

 आपला देश खरोखरच दुर्दैवी. एखादा तरुण कळकळीने एक सारखा देशहितासाठी झटत राहिला तर त्याला नानात-हेच्या अडचणी यावयाच्या व कधीं कधीं तर अगीं तरुणपणांतच देशहिताच्या त्या बिचान्याच्या सर्व योजना अपुऱ्या राहून बिचान्याला मरण यावयाचें असें पुष्कळ वेळां घडून येतें तसेंच थोडंसें विष्णुशास्त्री यांचें झालें. आतां कोठें त्यांनी स्थापन केलेल्या संस्था भरभराटीस व नांवारूपास येऊं लागल्या होत्या. त्यांची चांगली स्थिति पाहून एक नवीनच उद्योग सन १८८२ च्या आरंभापासून आपण सुरू करावा असे त्यांना वाटू लागले होते. आपल्या मराठी भाषेत निबंधमाला काढून जशी आपण उत्तम निबंधांची भर घातली, त्याप्रमाणेच 'ग्रंथमाला ' काढून उत्तम ग्रंथांची भर घालावी असे त्यांनी ठरविलें होतें. पण दैवानें निराळेंच ठरविले होते. अत्यंत भयंकर प्रसंग येण्यास कधीं कधीं अतिशय क्षुल्लक कारण पुरतें तसे येथें झालें. विष्णुशास्त्री यांचे जिवलग मित्राना वाटले की आपणां सर्वांचा फोटो काढवावा म्हणून ता० १५ जानेवारी