पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४७)

यांतील उत्तन विचारावी व लेखांची माहिती व्हावी, हेही पत्र आज चांगल्या तऱ्हेनें लोकसेवा करीत आहे.

काव्ये तिहाससंग्रह.

 आपले पूर्वजांचा इतिहास वाचून आपणाला त्यांचेचद्दल अभिमान वाटावा, त्यांच्यासारखे थोर आपण व्हावें अशी इच्छा त्या वाचनानें आपल्या मनांत उत्पन्न व्हावी असें विष्णुशास्त्री याचे मनांत नेहमीं येत असे. आपले देशाचा इतिहास पूर्वीच्या लोकांनी लिहून ठेवलेल्या बखरींत व रचलेल्या पोवाड्यांत उत्तम तऱ्हेनें दिलेला आहे अशी विष्णुशास्त्र्यांप्रमाणे रा. शंकर तुकाराम शाळिग्राम, रा.काशिनाथ नारायण साने व कै. जनार्दन बाळाजी मोडक यांचीही समजूत होती. म्हणून त्या साठी व प्रा संस्कृत काव्ये प्रसिद्ध करण्यासाठीं सन १८७८ च्या आरंभापासून रा. शाळि ग्राम, रा. साने, व रा.नोडक यांचे मदतीनें विष्णुशास्त्री यांनीं काव्येतिहास -संग्रह नांवाचे मासिक पुस्तक सुरू केले. या मासिकानेंही चांगले काम बरीच वर्षे केलें.

चित्रशाळा.

 इ. स. १८७८ साली विष्णुशास्त्री यांनी आणखी एक उपयुक्त संस्था स्थापन केली. तिचें नांव ' चित्रशाळा '. फोटो झिंको ऑफिसमध्ये ड्राफ्टमनचे कामांवर कोणी रा. बाळकृष्ण वासुदेव जोशी नांवाचे नोकर होते. त्यांना उत्तम उत्तम चित्रे काढण्याचा, व उत्तम चित्रे गोळा करण्याचा नाद असे. त्यांना त्यांच्या ऑफिसांत निरनिराळ्या रंगांत शिळाछापखान्यांत नकाशे कसे छापतात हे माहित होतें. त्यावरून -निरनिराळ्या रंगांत प्रसिद्ध ऐतिहासिक माणसांचीं व पौराणिक देवतांची चित्रे निरनिराळ्या रंगांत छापवितांयेतील असे त्यांना व विष्णुशास्त्री यांना वाटलें. नंतर विष्णुशास्त्री यांच्या पैशाच्या मदतीने रंगतिचित्रे छापण्यासाठी सन १८७८ च्या आरंभी चित्रशाळा छापखाना