पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४६)

सेंटीच्या मॅट्रिक परीक्षेत संस्कृतांत पहिला नंचर पटकावून जगन्नाथ शंकरशेट स्कालरशिप मिळविली.
 विष्णुशास्त्री यांनी जी जी गोष्ट हाती घेतली ती ती अत्यंत यशस्वी झाली. ते नुसती शाळा काढून थांबले नाहीत. शाळा काढून फक्त मुलांचींच मर्ने सुविचारांनी भरून टाकतां येतील पण ज्यांची शाळा सुटली आहे व जे आज निरनिराळ्या धंद्यांत गुंतलेले आहेत त्यांची वाट काय ? या मंडळीला स्वदेशाभिमानी, बाणेदार व बहुश्रुत बनवावें, एकंदर लोकांत चांगले विचार पसरवावे म्हणून आपल्या मदतगार मंडळीच्या अनुमतानें त्यांनी किरण नांवाचा एक छापखाना विकत घेतला व त्याचें नांव बदलून त्याला आर्यभूषण असे सुंदर नांव दिलें. बाळांनों, तो छापखाना अजूनही चांगला चालला आहे.

केसरी व मराठा.

 ज्यांना इंग्रजीचा गंधही नाहीं अशा लोकांनां जगात काय चालले आहे, आपल्या देशांत काय चालले आहे, आपल्या देशाची स्थिति कशी आहे, ती सुधारण्यास आपण काय काम केले पाहिजे, राजकीय हक्क आपण कसे मिळविले पाहिजेत, आपल्यांतील भुताखेतांच्या वगैरे वाईट समजती कशा टाकून दिल्या पाहिजेत, ऋषिकाळांतील कोणत्या चांगल्या गोष्टी आपण पुनः सुरू केल्या पाहिजेत, इंग्रजांपासून आपण काय काय शिकले पाहिजे, आपले उद्योगधंदे कसे सुधारले पाहिजेत वगैरे विषयांवर लेख लिहून सज्ञान व हुषार बनविण्यासाठी विष्णुशा स्त्रयांनीं सन १८८१ चे जानेवारी पासून 'केसरी' या नांवाचे वर्तमानपत्र मराठीत सुरू केलें तें आज सर्व मराठी पत्रांत पहिलें आहे. सन १८८१ च्या जानेवारीपासूनच निव्वळ इंग्रजी मजकुराचे 'मराठा' पत्र त्यांनी सुरू केले. तें अशाकरितां कीं इंग्रजी समजणाऱ्या निरनिराच्या गांवीं आपल्या देशबंधूना इंग्रजी वर्तमानपत्रे व मासिक पुस्तकें