पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४५)

शंय विद्वान् असे कै. गोपाळ गणेश आगरकर, लो. बाळ गंगाधर टिळक, रा. माधवराव नामजोशी, रा. भागवत, व रा. करंदीकर हे लगेच येऊन मिळाले. यामुळे आपली शाळा पहिल्या प्रतीची होणार व ती 'पूना हायस्कुल'ला चांगलाच टोला लगावून सर्व शाळांत पहिला नंबर पटकावणार अशी विष्णुशास्त्री यांना खात्री वाटली, व ती खरी ठरली. बाळांनों त्या शाळेचें नांव 'न्यू इंग्लिश स्कूल.' हैं न्यू इंग्लिश स्कूल सन १८८० चे जानेवारीचे पाहिले तारखेस विष्णुशास्त्री यांनी उघडलं. विष्णुशास्त्री यांचे हात अतीशय यशस्वी होते. त्यांनी सुरू केलेली ही शाळा सर्व हिंदुस्थानांत पहिल्या प्रतीची झाली आहे. त्या शाळेतून हजारों गरीब विद्यार्थी विद्वान् झालेले आहेत. त्या शाळेच्या मंडळीनंच पुढे नमुनेदार अर्से फर्ग्युसन कॉलेज काढले. तेही सर्व हिंदुस्थानांत पहिल्या प्रतचिं झालेले आहे. शास्त्रीबोवांच्या या 'न्यू इंग्लिश स्कूल'मधून व फर्ग्युसन कॉलेजामधून शिकून पुष्कळ विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीच्या मोठमोठ्या स्कॉलरशिपा व पदव्या मिळविल्या आहेत व पुष्कळजण आज देशकार्य करीत आहेत. सर्व जगांतील विद्वान् गणित्यांची केंब्रिजला एक परीक्षा होते ती फारच अवघड असते व त्या परीक्षेस बसण्यासाठी सर्व जगांतील नांवाजलेले गणिती येतात. त्या सर्वांत ज्याचा पहिला नंबर येतो त्याला सीनिअर रँग्लर असे म्हणतात व त्याला राजासारखा बहुमान मिळतो. असल्या त-हेचा बहुमान आपल्या हिंदुस्थानाला या विष्णुशास्त्र्यांच्या फर्ग्युसन कॉलेजनेंच मिळवून दिला. याच कॉलेजमध्ये शिकलेले ना. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे हिंदुस्थानांतले पहिले सीनीअर रँग्लर झाले, तेव्हां त्यांची, फर्ग्युसन कॉलेजची व या आपल्या हिंदुस्तान देशाची सर्व जगांत वाहवा झाली. असो.
 'विष्णुशास्त्र्यांचे हे 'न्यू इंग्लिश स्कूल ' पहिल्यापासून अतीशय यशस्वी झाले. पहिल्याच वर्षी या शाळेतील विद्यार्थ्यानें युनिव्ह-