पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४२)

इतकी नवीन कार्ये घडवून आणली की, त्यांनी जणू कांहीं नवीनच सृष्टि निर्माण केली असे वाटते. परंतु त्यांच्या सर्व कार्यात जर कोणाला पहिला नंबर यावा म्हणून विचारले तर कोणीही न चुकतां निबंध मालेचेंच नांव घेईल. असें जें तेजस्वी व लोकांची मतें खादिशीं बदलून टाकणारें तेजस्वी मासिक ' निबंधमाला ' तें विष्णुशास्त्री यांनीं इ. स. १८७३ साली सुरू केले.
 बाळांनों, पुष्कळदां अर्से घडते कीं अतीशय महत्त्वाच्या कार्याची कल्पना अगदर्दी सहज एखाया क्षुल्लक व्यक्तीकडून निघते. व ती निघते त्यावेळेला तें कार्य इतकें महत्त्वाचे होईल, एवढ़ें परिणामकारी होईल असें कोणाच्याच मनांत येत नाही. तसेंच निबंधमालेच झाले.
 चाळांनों मार्गे तुम्हांला सांगितलेंच आहे कीं, एखाद्या सुटीत बरे चसे फराळाचे डबे बरोबर घेऊन जिवलग मित्रांबरोबर रमतगमत एखाद्या सुटीच्या दिवशीं एखाद्या प्रसिद्ध स्थळाला पाय जावें ही गोष्ट विष्णुशास्त्री यांना फार आवडत असे. त्याप्रमाणे सन १८७३ सालीं नाताळांत विष्णुशास्त्री आपल्या बऱ्याच मित्रांना बरोबर घेऊन आळंदीस पायीं रमत गमत गप्पा गोष्टी करीत गेले. तेथे पोहोंचल्यावर बराच वेळ तेथें मजेनें घालविल्यावर मंडळी परतली. परत येतांना वाटेनें गप्पा चालल्याच होत्या. गप्पांचे ओघांत विष्णुशास्त्री यांचे एक मित्र रा. जांभेकर हे विष्णुशास्त्री यांस सहज म्हणाले, "तुझी एखादें मासिक पुस्तक कां काढीत नाहीं? त्यांत कधीं नवीन विषय घालावे व कधीं तुझीं शाळापत्रकांत संस्कृत कवींविषय जे निबंध यापूर्वी छापले आहेत त्यातीलच कांहीं घालावेत. " ही कल्पना विष्णुशास्त्री यांस बरीचशी पसंत पडली. मात्र जुने लेख पुनः या नवीन पुस्तकांत घालावे हें त्यांना आवडले नाहीं. नवीन मासिकांत नवीनच लेख घालावयाचे असें त्यांनी ठरविलें, व सर्व मासिक होतां होईल तो एकट्यानेंच चालवावयाचें असें त्यानी ठरविलें. यावरून ज्या निबंधमालेनें मराठी भाषेला नवीन जोमदार व तेजस्त्री रूप आणून दिले व जिन लोकांचे विचारांत अत्यंत