पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४१)

विष्णुशास्त्री यांनी लिहिले तरी त्यांतील विवेचन, टीका, भाषापद्धति व अंथपरीक्षण, फारच मार्मिक आहे. त्यांचे शाळापत्रकांतील लेख वाचून त्यांचे वडील फार खूष झाले व त्यांनी सर्वच शाळापत्रकाचें काम विष्णुशास्त्र्यांवर सोपविले. यामुळे विष्णुशास्त्री यांना फारच आनंद झाला; कारण आतां आपली लेखणी चालवावयाला हे चांगलेच साधन मिळाले असे त्यांना वाटले.
 खासगी नोकरींत विष्णुशास्त्री यांना फार दिवस रहावे लागलें नाही. त्यांचे वडील कृष्णशास्त्री यांचेविषय शाळाखात्याचे डायरेक्टर चाटफील्ड साहेब यांचे मनांत फार आदर असे. यामुळे विष्णुशास्त्री बी. ए. झाले हे कळल्यावर लवकरच त्यांनी आपण होऊन विष्णुशास्त्री यांना पुण्याच्या सरकारी हायस्कुलांत शिक्षकाची जागा दिली, व लवकरच तेथेंच त्यांना बढतीही दिली. अशा तऱ्हेनें विष्णुशास्त्री यांना प्रिय अशीं दोन का त्यांना सुरू करावयास सांपडली. ही दोन कामें म्हणजे मासिक पुस्तक चालवून आपल्या मतांचा लोकांत प्रसार करणें व · मुलांना उत्तम त-हेचें देशाभिमानी बनविणारें शिक्षण देणे. आतां हें खरें की, हें दुसरे काम त्यांच्या मनाप्रमाणे उत्तम तऱ्हेनें त्यांना सरकारी शाळेत करणे शक्य नव्हते, आणि म्हणूनच ते सरकारी शाळेत फार वर्षे टिकले नाहींत.

निबंधमालेस सुरवात.

 श्रीकृष्णाचें नांव घेतांच आपल्या पुढे गीता उभी रहाते, वाल्मीकींचें नांव घेतांच रामायणाची आठवण होते, लो. टिळकांचें नांव घेतांच केसरी डोळ्यासमोर दिसूं लागतो, कै. प्रि. आगरकरांचें नांव घेतांच सुधारकाचे स्मरण होते, त्याप्रमाणेच विष्णुशास्त्रयांचे नांव घेतांच, निबंधमाला दत्त म्हणून पुढे उभी रहाते. याचे कारण ज्या पुरुषाचें स्मरण करावें त्या पुरुषाचें जें अत्यंत महत्कार्य असेल ते आपल्या समोर उभे रहातें. विष्णुशास्त्री हे मोठे यशस्वी कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी