पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४०)
विष्णुशास्त्रयांचा आवडीचा व्यायाम.

 विष्णुशास्त्री कधीं कधीं बॅटबॉल खेळत, पण त्यांचा आवडीचा व्यायाम म्हटला म्हणजे पोहणे. ते डेक्कन कॉलेजमध्ये असतांना तासचे तास रा. ब. महाजनीबरोबर नहींत पोहत डुंबत असत. बाळांनों खरो. खरच मनुष्याला सशक्त, काटक व निरोगी बनविणारा, उत्तम व्यायाम म्हणजे पोहणें हाच होय. तुम्हांपैकी ज्यांना पोहतां येत नसेल त्यांनीं ते लवकर शिकावें. कारण पुढे मोठेपण तें लवकर साधत नाहीं.
 बाळांनों इतका वेळपर्यंत विष्णुशास्त्रयांच्या टपणची व विद्यार्थिदशेतील हकीगत सांगितली. आतां पुढें कर्ते पुरुष म्हणू यांचें चरित्र सांगावयाचे आहे. आतां म्हणजे इ. स. १८७१ चे शेवटीं विष्णुशास्त्री यांची बी. ए. ची परीक्षा पास झाली व ते विद्यार्थिदशा संपवून अध्यापकाचा म्हणजे शिक्षकाचा धंदा पतकरून नवीन आश्रमांत शिरले.

विष्णु शास्त्री - लेखक व शिक्षक.

 कॉलेजला रामराम ठोकल्यावर प्रथम कांहीं दिवस विष्णुशास्त्री एका खासगी हायस्कुलांत शिक्षक झाले. तें हायस्कूल कै. बाबा गोखले या नांवाच्या एका हुशार परंतु अव्यवस्थित गृहस्थांनी काढले होतें. तेथे शिकवीत असतांनाच फावल्या वेळी 'शाळापत्रक' या नांवाच्या मासिकांत वडिलांच्या आज्ञेवरून ते लिहूं लागले. त्यांचा आवडीचा विषय संस्कृत होता. संस्कृत कवीचे ग्रंथही त्यांनी मन लावून वाचले होते. यामुळे त्यांनी तोच विषय प्रथम हाती घेतला. संस्कृत कवि व त्यांचे ग्रंथ यांचवर त्यांनी फारच उत्तम लेख लिहिले आहेत. एकंदर पांच उत्तम संस्कृत कवींवर त्यांनी शाळापत्रकांत निबंध लिहिले. त्यांची नांवें कालिदास, भवभूति, बाण, दंडी व हर्ष. हे निबंध इतके उत्तम आहेत कीं, ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांस देखील पुष्कळ उपयोगी पडतात. हे निबंध जरी अगर्दी लहानपणी व नुकतेच बी. ए. झाले असतांना