पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३८)

नसत. ही गोष्ट फारच चांगली. कारण एक तर लक्ष्य लावून दिवसास अभ्यास केला तर रात्र अभ्यास करण्याची जरूरच राहात नाहीं. आणि दुसरें, रात्रीं अभ्यास नीट होतही नाहीं. शिवाय रात्रीं अभ्यास केल्यानें नजरही बिघडते. रात्रींचा वेळ झोप येईपर्यंत जिवलग मित्राशी गप्पा मारण्यांत किंवा आपल्याच मनाशीं कांहीं तरी गुणगुणण्यांत ते घालवीत असत. बहुतेक विद्यार्थ्यांचें लक्ष्य परीक्षेस नेमलेली पुस्तकें उत्तम तऱ्हेनें व चणें एवढ्याच गोष्टींत गुंतून गेलेलें असतें. आपण बरे कीं आपली परीक्षा बरी असे त्यांना वाटत असतें. तसें विष्णुशास्त्र्यांचें नसें. परक्षिला नेमलेल्या पुस्तकांशिवाय दुसरी पुष्कळ उत्तमोत्तम पुस्तकें वाचण्यांत ते बराच वेळ घालवीत, यामुळे त्यांच्या अंगीं बहुश्रुतपणा फारच आला. यामुळे त्यांच्या हातून निबंधमालेसारखें उत्तम मासिक निर्माण झालें. विष्णुशास्त्र्यांचा दुसरा एक स्वभावविशेष म्हटला म्हणजे त्यांचा विलक्षण साधेपणा. ते जसे मनानें साधे होते तसेच ते पोषाखानेही अगदी साधे होते. आढ्यतेचा किंवा डामडौलाचा त्यांना मनापासून अगदर्दी तिटकाराअसे. कालेजांत असतांना किती तरी विद्यार्थ्यांचा बराचसा पैसा व चराचसा वेळ पोषाखाची ठाकठिकी करण्यांत जातो. तसें विष्णुशास्त्री यांचें नसे. त्यांचा पोषाख अगदीं साधा असे. जसा त्यांचा पोषाख साधा तसाच त्यांचा स्वभाव अगदी साधा असे. एक आंत व एक बाहेर असे त्यांचें कधींही नसे. त्यांच्या अंगीं आढ्यता मुळींच नव्हती. ते आपल्या बोलण्यानें कधीही कोणाला दुखवत नसत यामुळे त्यांचें कोणाशींच शत्रुत्व नसे. ही गोष्ट बाळांनों, तुझांपैकीं भांडखोर व चढेल मुलांनी लक्ष्यांत आणून आपला भांडखोरपणा व चढेलपणा टाकून द्यावा म्हणजे ते सर्वांना आवडते होतील.
 विद्यार्थ्यांनी नाटके करण्याची चाल विष्णुशास्त्रयांचे वेळीही होती व त्यांनी देखील नाटकांत न्यायाधिशाचें काम केले होते असेत्यांचे एक बाळमित्र सांगत असत. पण हीं नाटके गॅदरिंगचे वेळींच होत असत. उठले सुटले की लागले नाटक करायला अर्से त्यांचे वेळी नव्हतें.