पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३५ )

तुम्हांपैकी ज्यांना बापाचा बाप व बापाची आई असेल त्यांना ही गोष्ट कांहीं सांगावयाला नको कीं आजाआजी नातवाचे फारच लाड करितात व त्याला कोठें ठेऊं व कोठें न ठेऊं असे त्यांना होतें. शिवाय असल्या बाळाला अपील कोटीचा मोठा आधार असतो. एखादे वेळेस जर आई किंवा बाप बोलले, रागावले किंवा त्यांनी एखादी थापड लगावली कीं हैं बाळ रडत आजोबांकडे किंवा आजीकडे अपील घेऊन जायचंच व तर्से गेल्यावर त्याचें काम सोळा आणे व्हावयाचेंच. लगेच आजोबा अथवा आजी नातवाला प्रेमाने कुरवाळीत बापावर अथवा आईवर रागावली म्हणजे बाळासाहेबांना खूप गंमत वाटावयाची. असो असलें हैं आजोबाआजीचें सुख विष्णुशास्त्र्यांना मिळाले होतें. त्यांचे आजोबा हेच त्यांचे सर्व लाड पुरवीत असत. व त्यांची सर्व प्रकारें काळजी घेत असत. यामुळे विष्णुशास्त्र्यांचें प्रेम त्यांचे वडिलांपेक्षां आजोबांवर विशेष असे. विष्णुशास्त्री यांचे वडील कृष्णशास्त्री हे मोठेसे धार्मिक नव्हते. पण विष्णुशास्त्री यांचे आजोबा हरिपंत मामा हे फार कमठ व धार्मिक होते. विष्णुशास्त्री नेहमी आजोबांच्याच जवळ असल्यामुळे त्यांनी आजोबांचे अनुकरण केले व ते धार्मिक बनले. विष्णुशास्त्री यांचे बाळपण सुखाचें होण्याला तिसरें कारण म्हटले म्हणजे वडिलांची चांगली स्थिति. त्यांच्या लहानपण त्यांचे वडील कृष्णशास्त्री यांची स्थिति फारच सुखदायक होती. त्यांना लोकांत फार मान मिळत असे. नोकरी मोठ्या पगाराची व हुयाची असे. यामुळे ते नेहमीं सढळ हातानें खर्च करीत व नेहमीं आनंदी असत. त्यांच्या चेहऱ्यावर त्रासिकपणा कधीही दिसत नसे. या तिसऱ्या कारणामुळे विष्णुशास्त्री यांचे बाळपण गरीबांच्या मुलाप्रमाणे किंचितही साचें किंवा दुःखाचें गेलें नाहीं. त्यांना जें जें वाटे तें लागलेंच मिळत असे. विष्णुशास्त्री यांचें बाळपण सुखाचें जाण्यास चौथें कारण घरांतले घरांतच बरोबरीचे पुष्कळ खेळगडी. त्यांचे बंधु व त्यांच्याच वयाचे त्यांचे चुलते सीतारामपंत व दुसरे नात्याचे खेळगडी त्यांना