पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३२)

बाळगला पाहिजे. हे मत स्थापन करणारा पुरुष जन्माला आला. त्याचं नांव विष्णु कृष्ण चिपळूणकर. याच थोर पुरुषाचें चरित्र सोप्या भाषेत बाळांनों, मी तुम्हाला सांगणार आहे. या थोर पुरुषानें नवें महाराष्ट्र अवघ्या ८-१० वर्षांत निर्माण केले. त्यांनी नोकरांपेक्षां स्वतःच धंदा करून पोट भरणें अधिक चांगले आहे हे लोकांना शिकविलें. त्यांनीं नवीन पद्धतीचें शिक्षण मुलांना देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे नवीन इंग्रजी शाळा काढली. लोकांना चांगलीं पुस्तकें मिळावी म्हणून नवीन किताबखाना काढला. लोकांत स्वावलंबन व स्वाभिमान वाढावा व मराठी भाषेचें बखरीवजा मिळमिळीत वळण बदलून तिला तेजस्त्री व जोरदार बनवावी म्हणून निबंधमाला सुरू केली. सर्व लोकांना नवीन विचार, नवीन ज्ञान, नवीन राजकीय चळवळ व सामाजिक, औद्योगिक, धार्मिक सुधारणांबद्दल माहिती मिळावी म्हणून केसरी व मराठा अशीं दोन वर्तमानपत्रे काढलीं. वर्ती छापण्याचें काम नीट व्हावे म्हणून आर्यभूषण नांवाचा नवीन छापखाना काढला. लोकांना आपल्या देवांच्या व पूर्वजांच्या सुंदर तसबिरी थोडक्यांत मिळाव्या म्हणून चित्रशाळा नांवाचा नवीन छापखाना काढला. आपले पूर्वज किती थोर होते हैं समजून त्यांचेबद्दल आपल्या मनांत आदर उत्पन्न व्हावा म्हणून काव्येतिहाससंग्रह नांवाचे मासिक पुस्तक काढलें. अशा त-हेनें आपल्या ह्या महाराष्ट्र देशाला त्यांनी अगदर्दी नवीनच रूप दिले. या महाराष्ट्रांत नवयुग सुरू केलें, म्हणूनच त्यांना नव्या महाराष्ट्राचे जनक अथवा उत्पादक असे आपण म्हटले आहे.
 अशा या तेजस्वी, कर्तबगार, हिम्मतबहाद्दर यशस्वी पुरुषाचा जन्म तारीख २० मे १८५० रोजी पुणे येथे झाला. ह्यांच्या वडिलांचें नांव कृष्णशास्त्री चिपळूणकर.

पूर्वजांची थोडी माहिती.

 चिपळूणकरांचें घराणे मूळच पावस या गांवचें हें गांव रत्नागिरी जिल्ह्यांत आहे. सतरावे शतकाचे आरंभी या घराण्यांतील एक पुरुष