पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३१)
अर्वाचीन महाराष्ट्राचे जनक
विष्णुशास्त्री चिपळूणकर.

 इंग्रजी अम्मल व इंग्रजी भाषा आपल्या या महाराष्ट्रांत इसवी सन १८१८ पासून सुरू झाली. इंग्रजी भाषा आपल्यांतील हषार लोक शिकूं लागले. इंग्रजी साधारण थाडस शिकतांच मोठाल्या नोकऱ्या मिळू लागल्या. या गोष्टीचा असा परिणाम झाला, की आपले जुनें तेवढे सर्व वाईट. इंग्रजी पोषाख, इंग्रजी चालीरीति, इंग्रजी भाषा, इंग्रजी खाणें पिणें वगैरे सर्व चांगलें, आपलें तेवढे सर्व वाईट, असा सर्वत्र ग्रह होऊं लागला. 'राजा कालस्य कारणं' म्हणजे राज्य कर्त्याप्रमाणें काळ बदलतो अथवा राज्यकर्त्यांचें सर्व उत्तम असें सहज लोकांच्या मनांत येते व लोक आपला पोषाख वगैरे सर्व राज्यकर्त्यां प्रमाणे करूं लागतात. त्याचें प्रत्यंतर शाहाजी राजे, शिवाजी महाराज व त्या काळचे मराठी सरदार अथवा त्या काळची मराठी भाषा यांच्याकडे पाहिलें म्हणजे लक्ष्यांत येईल. त्याकाळचे मराठे मुसलमानांप्रमाणे पोषाख करीत असत. त्याकाळच्या मराठ्यांची मराठी भाषा मुसलमानी म्हणजे उर्दू शब्दांनी भरलेली असे. आजही अफगाणिस्तानांत पहाल तर हिंदूंचा पोषाख थेट अफगाण लोकांसारखा आहे. आपलाही पोषाख आज इंग्रजी वळणावर झुकला आहे. हे असे चालावयाचेंच, पण याचा अतिरेक झाला म्हणजे याला थांबविण्यासाठी एखादा थोर पुरुष निर्माण होतो. अशाच तऱ्हेचे थोर पुरुष निर्माण होण्याची १८५०च्या सुमारास फार जरूर होती; कारण सन १८१८ पासून आपलें तेवढें सर्व टाकाऊ व परकय तेवढें सर्व चांगले, या मताचा तीस वर्षे एकसारखा फैलाव होऊन १८५० च्या सुमारास त्याचा अतिरेक झाला. त्याबरोबर त्या मताचें खंडण करणारा व जुन्यांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, आपली भाषा, आपले रीतरिवाज, आपले पूर्वज, आपला धर्म, आपला इतिहास, आपली पुराणे, यांचा आपण अभिमान