पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९ )
न्यायमूर्तीची शेतकी सुधारण्यासंबंधाची कामगिरी.

 शेतकरी लोक सर्व देशाचे आधारस्तंभ, त्यांनी पिकवावें व सर्वांनी खावें अशी खरी स्थिति. पण पहावें तों सर्व वर्गीपेक्षां शेतकऱ्यांची स्थिति अधिक वाईट, हें न्यायमूर्ति माधवराव यांच्या लक्ष्यांत येतांच त्यांनी नीट चौकशी करून शेतकरी लोकांचा कर्जबाजारीपणा दूर होईल अशा त-हेची व्यवस्था सरकारकडून करविली. पण अज्ञानामुळे शेतकऱ्यांची स्थिति अजून सुधारली नाहीं. आतां हें अर्धवट राहिलेले काम स्वदेशबंधूंनी स्वार्थत्यागपूर्वक श्रम करून शेतकरी लोकांना शिक्षण देऊन पुरें करावें.
 असो. अशा तऱ्हेने अत्यंत परिश्रम करून देह झिजवून न्यायमूर्तीन देशबंधूंची सर्व बाजूंनीं सुधारणा व्हावी म्हणून अतिशय कष्ट केले. त्यांच्या खटपटीनें आपल्या देशाचा शिक्षणांत, उद्योगधंद्यांत, राजकीय प्रगतींत व सामाजिक सुधारणेच्या काम फार फायदा झाला आहे. त्यांनी केलेल्या उपकारांची आपण फेड करावी असे बाळांनों, तुम्हांला वाटतेंना ? तर मग तुम्ही देखील स्वदेशाची स्थिति सुधारण्यासाठी मोठेपणीं झटा म्हणजे स्वर्गीत न्यायमूर्ति माधवरावांना आनंद होईल व ते तुम्हांला आशीर्वाद देतील. बाळांनों, आपले न्यायमूर्ति हे गेल्या शतकांतील स्वदेशास सुस्थिति प्राप्त करून देण्यासाठी ज्या ज्या नाना प्रकारच्या चळवळी झाल्या त्या सर्व चळवळींचे एक मुख्य उत्पादक होते. हे आतांपर्यंत सांगितलेल्या हकीगतीवरून बाळांनो, तुमच्या लक्षांत आलेंच असेल. दुसरे पुढारी एक दिशा घेऊन त्या एकच दिशेनें देशसेवा करितात. आपल्या प्रिय न्यायमूर्तींनी देशाची सेवा सर्व दिशांनीं केली. राजकीय प्रगतीसाठी त्यांनी राष्ट्रीय सभा काढली, पुण्यास सार्वजनिक सभा व डेक्कन सभा स्थापिल्या, धार्मिक सुस्थिति प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थनासमाज अथवा भजनसमाज काढले,समाजाची सुस्थिति व्हावी, त्याला ऋषींच्या काळांतील चांगल्या गोष्टींची व चांगल्या चालीरीतीची प्राप्ती व्हावी म्हणून दरवर्षी सामा