पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२८)

करूं या, असे त्यांचें नेहमीं सांगणे असे. त्याचप्रमाणे लोकांना मागे टाकून भरकन आपण पुढे जावें हें त्यांना बरोबर वाटत नसे. थोडे मंदगतीनें पण लोकांची मनें न दुखवितां त्यांना बरोबर घेऊन पुढें पाऊल टाकावें असें त्यांचें मत होते. यामुळे सर्व लोकांना जुन्यांना व नव्यांना ते थोरव वंदनीय असे वाटत असत.

न्यायमूर्तीची शिक्षणविषयक कामगिरी.

 न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज स्थापून लोकांना तेजस्वी व स्वाभिमानपूर्ण शिक्षण होईल तितक्या थोड्या खर्चात यावें अर्से जेव्हां लोकमान्य टिळक व प्रिन्सिपॉल आगरकर यांचे मनांत आले तेव्हां ते माधवरावाकडे गेले व त्यांची सल्ला त्यांनी विचारली. त्याकाम धवरावांनी त्यांना पुष्कळ उपयुक्त सूचना केल्या व उत्तेजन व मदत दिली. औद्योगिक शिक्षणासाठी देखील त्यांनी पुष्कळ खटपट केली. त्यांना विद्यार्थ्यांच्याविषयी नेहमीं कळकळ वाटत असे. विद्यार्थ्यांनी वर्षभर सर्व विषयांवर अतिशय परिश्रम घ्यावे व मग एखाद्या विषयांत थोडेसे कमी मार्क मिळतांच त्यांना बाकीच्या पास झालेल्या विषयांचा देखील पुनः पुढले वर्षी अभ्यास करण्यास भाग पाडावें ही गोष्ट अगदर्दी अयोग्य, अन्यायाची व जुलमाची आहे, असे न्यायमूर्तींना वाटत असे. यासाठी हा अन्याय दूर करण्यासाठी प्रकृति बरोबर नसतांही त्यांनी जिवापाड मेहनत केली. या त्यांच्या मेहनतीचा त्यांच्या मृत्यूनंतर उपयोग होऊन आतां बऱ्याच परीक्षांत पास झालेल्या विषयांत पुन: परीक्षा देण्याची जरूर नाहीं असा नियम झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे बरेच श्रम वांचले आहेत.
 न्यायमूर्तीची दुसरी खटपट म्हणजे मराठी भाषेला युनिव्हर्सिटीत योग्य मानाचे स्थळ मिळवून देण्याची त्या कामी त्यांनी फार खटपट केली. त्या खटपटीमुळे आतां एम. ए. च्या परीक्षेत व मॅट्रिकच्या परी-क्षेत मराठीचा प्रवेश झाला आहे.