पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७)

काळीं ज्याप्रमाणे मुलें गुटगुटीत, चपळ, गुरूवर प्रेम करणारी, विद्या शिकण्यांत गर्क झालेलीं व कष्टाचीं कामें करून धहींकहीं व तालिमंबाज असत तशीं हल्लींचींही असावी, असे आपणाला साहजिकच वाटतें. असेंच न्यायमूर्तींना वाटत असे याबद्दल त्यांना अतिशय तळमळ वाटत असे. यामुळे त्यांनी राष्ट्रीयसभेबरोबरच सामाजिक परिषद भरण्याचा क्रम सुरू ठेवला होता. निरनिराळ्या प्रांतांत हें कार्य चालावें म्हणून ते अतिशय खटपट व श्रम करीत, सर्व प्रांतांतील पुढान्यांस पत्र लिहून त्यांचेकडून निरनिराळ्या प्रांतांत काय काय चुकीच्या चालीरीती आहेत, त्यांत बदल करण्याचा कसकसा प्रयत्न होत आहे, हे सर्व ते समजावून घेत व सर्व सामाजिक चळवळीचा वर्षाचा रिपोर्ट तयार करून तो डिसेंचरांत भरणाऱ्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेपुढे मांडीत असत. राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या जनरल सेक्रेटरीचें काम त्यांनी पुष्कळ वर्षे अतीशय कळकळीने केले. त्यांचीं सामाजिक परिषदेतील भाषणें अतिशय मनन करण्यासारखी झाली आहेत. समाजांतील सर्वांना समतेनें व न्यायानें वागवावें, अशी जी प्राचीन ऋषिकाळाप्रमाणें आतांही लोकांची समजूत होऊं लागली आहे हे त्यांच्याच खटपटीचें फळ होय. स्त्रीशिक्षणाची हल्लीं जी एवढीं वाढ झाली आहे, मुलांच्याप्रमाणें मुलीदेखील हायस्कुलांत व कालेजांत दिसूं लागल्या आहेत व पहिला नंबर आणून संस्कृत लिशिपा व बक्षिसे सालोसाल पटकाबूं लागल्या आहेत हे देखील न्यायमूर्ति माधवरावांच्या खटपटाचें फळ होय. न्यायमूर्ति माधवराव यांच्या समाज-सुधारणेच्या चळवळींत एक गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. अमुक एक सुधारणा अथवा नवीन गोष्ट परकीय लोकांपासून आपण ध्यावी अथवा नवीनच सुरू करावी, असे त्यांनी कधींही केले नाहीं. आपल्या ऋषींचा व ऋषिकाळांतील उत्तम गोष्टीचा माधवरावांना फार अभिमान असे. ऋषिकाळांत अमुक अमुक गोष्ट किंवा चाल होती ती मधल्या अज्ञानाच्या काळांत बंद पडली, ती आपण पुनःसुरूं