पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३ )

बळानें या आपल्या देशास जास्त राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी झटत असत. सन १९०० सालीं डिसेंबर महिन्यांत म्हणजे मरणाच्या केवळ पंधरावीस दिवस आर्धी ते अतिशय आजारी व अशक्त झाले होते तरी राष्ट्रीय सभेस जाण्याची माधवरावजींनी तयारी केली, बांधाबांध केली. छातींत एकसारखी कळ येत होती, झोप येत नव्हती तरी त्यांनीं त्याची पर्वा न करता स्वदेशप्रेमासाठी राष्ट्रीय सभेस जाण्याचा निश्चय कायम केला. इतक्यांत डॉ. सर भालचंद्र आले व त्यांनी सांगितलें, 'डॉक्टर या नात्यानें तुम्हांला जाऊं देत नाहीं.' कुटुंबांतील सर्व मंडळी व इतर थोर देशभक्त यांनी डॉक्टरांच्या मताला दुजोरा दिला व सर्वांनी संगनमत करून केवळ न्यायमूर्तीच्या भयंकर स्थितीकडे लक्ष देऊन त्यांना जाऊं दिले नाहीं. तेव्हां न्यायमूर्तींना अतिशय वाईट वाटलें. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या व आजपर्यंत राष्ट्रीयसभेचें दर्शन आरंभापासून एकसारखें होत होतें तें यंदां होत नाहीं म्हणून न्यायमूर्तीींना अतिशय गहिंवर आला. नामदार गोखले व ना. न्या. चंदावरकर यांनी पुष्कळ समाधान केले. तुम्हीं सांगाल ती कामगिरी आम्हीं तुमच्या मनाप्रमाणे करितों असें सांगितलें. तेव्हां न्यायमूर्ति म्हणाले ' आतां या कार्याचा भार यापुढे तुम्हांलाच वहावयाचा आहे.' असो. बाळांनों, पाहिलेतना केवढे हें स्वदेशप्रेम. बाळांनों, तुम्ही देखील स्वदेशावर असेंच निस्सीम प्रेम ठेवा व देशसेवा करा.

न्यायमूर्तीची औद्योगिक कामगिरी.

 आपला हिंदुस्तान देश ईश्वराचा अतिशय लाडका, असें जें न्यायमूर्ति नेहमी म्हणत असत ते अगदी खरें आहे. सर्व जगांतील निरनिराळ्या ठिकाणांतील उत्तम हवा-पाणी, उत्तम पदार्थ निरनिराळे सुंदर व उपयोगी पशुपक्षी, निरनिराळ्या देशांतील सुंदर फुलें, फळें, वेळी, वृक्ष, धातु, हिरे, माणकें, कोळसे, मोर्ती, जें वाटेल तें या आमच्या देशांत आहे. सुंदर वनशोभा, अत्यंत मोठ्या नद्या, अत्यंत उंच पर्वत आमच्या देशांत आहेत. आमच्या देशासारखी सुपीक जमीन दुसरीकडे