पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२)

शिखरावर गेलीं व शेवटीं नाश पावली. त्यांचें आतां नांवदेखील ऐकू येत नाहीं. तसे आमच्या प्रियकर हिंदुस्तानाचें नाहीं. आमचें प्रियकर हिंदुस्तान हजारों वर्षीपासून अत्यंत सुधारलेले आहे. आमच्या प्रियकर हिंदुस्तानाचे वेदग्रंथ हे सर्व जगांत अतिशय जुने आहेत. आमचा आर्यधर्म, आमचा ऋषींनीं लालनपालन व संवर्धन केलेला आर्यधर्म सर्व वर्मीत जुना आहे. आमची भरतभूमि धर्मभूमि आहे. सर्व धर्माचा उगम आमचे देशांत झालेला आहे. सर्व देश अज्ञानांत लोळत होते, तेव्हांपासून आमचा देश सुधारलेला आहे. पुष्कळ भरभराटीस आलेले देश नाहींसे झाले तरी आमचा हिंदुस्तान देश देवानें कायम ठेवल आहे. यावरून हा देश देवाचा अतिशय लाडका आहे, पुढे मागें या देशाकडून सर्व जगाची मोठी कामगिरी देवाचे मनांत करून घ्यावयाची आहे, असें न्यायमूर्ति माधवराव यांचें नेहमीं म्हणणे असे. त्याप्रमाणे ते नेहमीं स्वदेशबांधवांना सांगत असत. आपल्या हिंदुस्तानाचे ऐक्य व्हावें व संयुक्त हिंदुस्तानाला स्वराज्य प्राप्त व्हावे असें त्यांचें मत असे. हिंदुस्तानची राजकीय स्थिति सुधारावी राजकीय हक्क मिळविण्यासाठी सर्व हिंदुस्तानांत राजकीय चळवळ सुरू करावी म्हणून सर्व हिंदुस्तानची राष्ट्रीयसभा स्थापण्यांत आली. तिची रचना करण्याचे कामांत सर्व राष्ट्रीय पुढारी माधवरावजी रानडे यांचेकडे गेले व माधवरावजींनी अतिशय मेहनत घेऊन त्यांचें लाडकें पुणे शहर येथेच राष्ट्रीय सभेची पहिली बैठक इसवी सन १८८५ साली भरविण्याचे ठरविलें. सर्व जुळवाजुळव झाली, पण नेमानेम कांहीं निराळा होता. यामुळे त्या सुमारास पुण्यास कॉलरा सुरू झाला, यामुळे पहिली राष्ट्रीय सभा मुंबईस १८८५ च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत भरली. यावरून बाळांनों, आपले माधवरावजी राष्ट्रीय सभा स्थापन करणारांपैकी एक प्रमुख होते, हे आपल्या लक्षांत येईल. आरंभापासून तों शेवटच्या दुखण्यानें जाणे अशक्य होईपर्यंत ते स्वदेशप्रेमानें दरवर्षी राष्ट्रीय सभेस जात असत व आपल्या बुद्धि-