पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१)

भरलेली आहेत. बाळांनों, तीं वाचलीं असतां मन आनंदानें व पवित्र विचारांनी भरून जातें. तीं तुम्हीं वाचा म्हणजे तुमचें मन निष्पाप व पवित्र होईल व तुम्ही देवाचे प्रेमळ भक्त व्हाल. बाळांनों, त्या पुस्तकाशिवाय श्रीमती परमपूज्य रमाबाईसाहेब रानडे यांनी दुसरें एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्याचें नांव 'आमच्या आयुष्यांतील कांही आठवणी.' बाळांनों, हें पुस्तक फारच मनोवेधक व बोधपर आहे. मी ते कितीतरी वेळां वाचलें आहे तरी आणखी पुनः पुनः ते वाचावें असे वाटतें. त्या पुस्तकांत न्यायमूर्ति रानडे यांची पितृभक्ति, वडील माणसांविषयीं आदरबुद्धि, कुटुंबांतील माणसांचें खरें हित साघण्याबद्दल तत्परता, नोकराविषय प्रेम व कळकळ, पत्नीस सुशिक्षित, भगवद्भक्त व परहिततत्पर करण्याविषयींची आस्था, निरनिराळ्या स्वदेशबांधवांना उत्तेजन देऊन त्यांच्याकडून धार्मिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक व शिक्षणसंबंधी कामगिरी करून घेण्याची हातोटी, विरोधी माणसाबद्दलही त्यांना वाटणारा आदर व प्रेम, विद्यार्थ्यास मदत करण्याविषयीं आवड, शारीरिक क्लेश भोगीत असतांही देशहितासाठीं चालू ठेवलेली धडपड, लोकहिताची अनेक कामें करीत असतांही त्यामुळे होणारी स्तुतिस्तोत्रे टाळण्याचा अट्टाहास, पुणे शहर, पुणेकर व मराठी भाषा यांवरचें निस्मीम प्रेम, डामडौलाचा व नटण्याचा तिटकारा, साधेपणाची हौस, बाळांच्या संगतीची विलक्षण आवड, एकही मिनिट व्यर्थ जाऊं न देण्याचा निश्चय, दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतः नुकसान व मानहानि सोसण्याची तयारी, नियमबद्ध आहारविहार, पूर्वजांच्या थारे पराक्रमांबद्दल अभिमान, सुखांत आणि दुःखांत मनाची शांतता कायम ठेवण्याचें सामर्थ्य वगैरे फारच उत्तम तऱ्हेने दाखविले आहे. यासाठी तें पुस्तक बाळांनो, तुम्ही अवश्य वाचा. त्या पुस्तकांत नमुनेदार गृहस्थ व नमुनेदार गृहिणी कशी असते हें तुम्हांला दिसून येईल.

न्यायमूर्ति यांची राजकीय कामगिरी

 आमचा हिंदुस्तान देश देवाचा सर्वांत लाडका आहे. गेल्या पंचवीस हजार वर्षांत मोठमोठाली राष्ट्र उदय पावलीं, भरभराटीच्या