पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २० )

होतें हैं स्पष्ट दिसून येतें. देवाची भक्ति, देवाचें भजन करणे हे त्यांना फारच आवडत असे. ते नेहमीं भजन करून भजनापासून होणारा आनंद अनुभवीत असत. न्यायमूर्तीचा स्वभाव नेहमीं असा असे, कीं जो आनंद आपल्याला मिळाला तो आपलपोटेपणानें आपण एकट्यानेंच न अनुभवतां, त्याचा अनुभव सर्वोस मिळवून द्यावा. या स्वभावाप्रमाणे ते ज्या ज्या शहरीं गेले तेथें तेथें त्यांनीं प्रार्थनासमाजांचा उत्कर्ष केला. प्रार्थनासमाज म्हणजे कांहीं तरी खूळ आहे, हें नुसतें ख्रिस्ती धर्माचें अनुकरण आहे, हें बडे लोकांचें एक सोंग आहे यांत कांहीं अर्थ नाहीं, असा दुर्देवानें पुष्कळांचा चुकीचा समज झाला आहे. खरें पाहूं गेलें तर माझ्या अल्प मतीला जें दुरून तिन्हाईत या नात्यानें दिसलें तें हें कीं, प्रार्थनासमाज म्हणजे एक सुशिक्षितांचा भजनसमाज आहे. श्रद्धाळू देवभक्तांनी रजेच्या दिवशीं म्हणजे रविवारीं एकत्र जमावें, ईश्वराचे गुण गावे, तुकाराम, रामदास वगैरे साधुसंतांची कवनें गावीं व आपली मनें भक्तीनें भरून व शुद्ध - निष्पाप-प्रफुल्लित करून घरोघर जावें असा साधारण या समाजाचा कार्यक्रम दिसतो. या कार्यक्रमांत वावर्गे काय आहे ? खरोखर बावर्गे कांहीं नाहीं. स्वजनांनीं तेथें जाऊन पाहावें म्हणजे खात्री होईल. आतां सर्व जाती मोडाव्या असें एक त्या समाजाचें तत्त्व आहे असें ऐकतों, पण स्वतःच्या जाती कायम ठेवून त्या समाजांत असलेले पुष्कन्ट लोक दृष्टीस पडतात. तेव्हां तें तत्त्व न पाळलें तरी चालतें असें दिसतें. असो. न्यायमूर्तिनीं भक्तिमार्गाची व भागवतधर्माची उन्नति करण्याचा अतिशय यत्न केला व त्यांत त्यांना पुष्कळ यशही आले. याच संबंधानें त्यांनी पुष्कळ धर्मपर व्याख्यानें दिलीं, तीं अतिशय सुंदर होतीं, असें तीं ज्या लोकांनीं ऐकली त्यांच्या अनुभवास आलें. त्या व्याख्यानांचा लाभ आपणां सर्वोस मिळावा म्हणून स्वदेशहितरत श्रीमती रमाबाईसाहेब रानडे न्यायमूर्तीच्या सुशील पत्नी यांनी अतिशय परिश्रम घेऊन तीं व्याख्यानें एकत्र गोळा केलीं आहेत व त्यांचें एक सुंदर पुस्तक तयार केले आहे. बाळांनों, तीं व्याख्याने भक्तीच्या प्रेमळ रसानें