पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९)

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रेत स्वतः वाहून नेण्याचा हट्ट धरला. व त्याप्रमाणे त्यांनीं केलें. सर्व जगांतून दुःखाच्या तारांचा नुसता वर्षाव झाला. त्यांच्या सुशील व त्यांच्याप्रमाणेच थोर व स्वदेशसेवेंत नेहमीं गढून गेलेल्या त्यांच्या पत्नी श्री. रमाबाईसाहेब रानडे यांना राजेलोकांपासून तो रंकापर्यंत सर्वांकडून सहानुभूतीचे संदेश आले. स्मशानभूमि सर्व धर्माच्या, व सर्व दर्जीच्या लोकांनीं अगदीं गजबजून गेली होती. निरनिराळ्या शाळांतील हजारों मुलें यासाधु पुरुषाचें शेवटचें दर्शन घेण्यासाठी व त्यांना वंदन करण्यासाठी आली होती. गव्हर्नरसाहेबांच्या अध्यक्षतेखालीं टाऊनंहॉलमध्ये मुंबईस प्रचंड सभा भरली व थोरथोरांनी न्यायमूर्तीचें गुणवर्णन करून त्यांचे वियोगानें झालेले दुःख निवेदन केले.
 बाळांनों, इतका वेळ न्यायमूर्तीच्या चरित्राचें माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी वर्णन केलें. आतां त्यांच्या निरनिराळ्या देशहिताच्या कामगिरीबद्दल व ती आपल्याला कशी अत्यंत फायदेशीर झाली आहे त्याबद्दल थोडेसें सांगणार आहे. नंतर बाळांनों त्यांच्या चरित्रापासून तुम्हीं कोणत्या गोष्टी शिकाव्या तें सांगणार आहे. तें तुम्हीं पुनः पुनः वाचून त्याप्रमाणें बागा म्हणजे देव तुमचें कल्याण करील. तुमचे देशबंधू, आईबाप व नातलग तुमच्यावर प्रेम करतील च राजापासून रंकापर्यंत सर्व तुमची कीर्ति गातील.

न्यायमूर्ति यांची धार्मिक कामगिरी.

 लहानपणापासून न्यायमूर्ति फार श्रद्धाळू व भक्तिमान ह्येते. त्यांना साधुसंतांचे अभंग घोळून घोळून म्हणण्याची व ते म्हणत असतां अगदीं तल्लीन होण्याची संवय असे. मोठ्या पहांटेस म्हणजे तीन चार वाजता उठून तुकोबारायांचे अभंग मोठ्या प्रेमानें घोळून घोळून नेहमी ते म्हणत असत व अभंग म्हणत असतां अक्तीच्या प्रेमानंदानें त्यांचें अंतःकरण इतकें भरून जाई, की त्यांच्या डोळ्यांतून सारख्या आनंदाश्रूंच्या धारा बाहू लागत. यावरून किती प्रेमळ व थोर देशभक्त