पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८)

सरकारने त्यांना एकदम दरमहा आठशे रुपयांवर पुण्यास फर्स्टक्लास सबजज्ज नेमिलें. यानंतर त्यांना स्पेशल जज्जाची जागा मिळाली व इ० स० १८९२ साली मुंबई हायकोर्टात न्यायाधीशाची जागा त्यांची थोर योग्यता लक्ष्यांत आणून सरकारांनी त्यांना दिली. या थोर पदावर माधवरावजींनी १९०१ पर्यंत उत्तम तऱ्हेनें काम केले. त्यांनी हायकोर्टजज्ज या नात्यानें हिंदू लॉ अथवा हिंदूंचा कायदा पुष्कळच सुधारला. निरनिराळ्या स्मृति व त्यावरील टीका यांचा नीट अर्थ लावून दत्तविधानासंबंधी पुष्कळच इष्ट सुधारणा घडवून आणल्या. है काम कांहीं सोपें नव्हते. त्यासाठी निरनिराळ्या स्मृति वाचर्णे अतिशय जरूर होतें. त्याशिवाय जुनी अर्थ लावण्याची पद्धति निरनिराळ्या शब्दांचाजना अर्थ ह्या सर्वांचें मनन करणे अत्यंत जरूर होते. ह कष्टाचे काम स्वजनांचें हित करण्यासाठी त्यांनीं केलें, नाहीं तर मागच्या निकालाप्रमाणे पुढे निकाल देणें हें फारच सोपें होतें. बरें तक श्रम घेतल्यावर तरी न्यायमूर्तींनीं-कारण आतां माधवरावांना न्यायमूर्ति असेच म्हणणें योग्य आहे-आणखी त्रास घ्यावयाचा नव्हता. पण स्वजनांबद्दलची कळकळ त्यांना थोडकीच स्वस्थ बसू देणार होती ? त्यांनी आपल्या मातृभाषेचा म्हणजे मराठीचा शिरकाव युनिव्हर्सिटीच्या सर्व परीक्षांत व्हावा म्हणून जिवापाड मेहनत केली व त्यामुळे त्यांची प्रकृति इतकी बिघडली की ती पुनः कांहीं ताळ्यावर आली नाही. त्यांचें नेहमीं एक म्हणणे असे कीं 'That is proper death while working ' म्हणजे हंतरुणावर पडून व्यर्थ आयुष्य कंठीत झिजत झिजत मरण्यापेक्षां आपलें काम बजावीत असतां मरणें हेंच योग्य ?
 या बाबतींत त्यांच्या इच्छेप्रमाणेच झालें. स्वदेशाच्या व स्वजनांच्या सेवेंत देह झिजवीत असतांच त्यांना सन १९०१ च्या जानेवारींत शांतपणे मरण आलें. त्यांच्या मरणाची बातमी समजतांच सर्व हिंदुस्तान दुःखांत बुडून गेले. विद्यार्थ्यांविषयींच्या त्याच्या कळकळीमुळे