पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६)

होती. त्यांत माधव शिकावयास जाऊं लागला. पहिल्यापासूनच तेथे माधवाचा पहिला नंबर असे. त्याला पहिल्या वर्षी दहा, दुसऱ्या वर्षी पंधरा व तिसऱ्या वर्षी वीस रुपये अशी स्कॉलरशीप होती, मुंबईस तीनच वर्षांत माधव मॅट्रिक्युलेशनचे परीक्षेत पास झाला व त्या परीक्षेत त्याचा पहिला नंबर आला. बाळांनों, हें कशाचें फळ बरें ? बाळांनों, हें माधवाच्या एकाग्रतेचें फळ. कोणत्याही गोष्टींत मन घातलें म्हणजे दुसरा कोणताही विषय मनांत येऊं द्यावयाचा नाही असा माधवाचा नियम असे. नाहीतर तुम्ही. इकडे भूगोल घोकणें चालले आहे तोंडानें, तर तिकडे रस्त्यांत कोण जातो येतो आहे इकडे सारें लक्ष्य. मग पाठ कितपत होईल तें दिसतेंच आहे. असा अभ्यास करून पहिला नंबर येत नसतो. अभ्यास करावयास बसलेत म्हणजे बाळांनों, अभ्यासाशिवाय दुसऱ्या कशाकडेही तुमचें लक्ष जातां उपयोगी नाहीं. असो. १८५९ सालीं अशा तऱ्हेनें मॅट्रिक झाल्यावर आपले माधवराव कॉलेजचा अभ्यास करूं लागले. कालेजांत त्यांना प्रथम दरमहा साठ व नंतर १२० रुपये फेलोशिप मिळत असे. कालेजांतीलही सर्व परीक्षांत त्यांचा पहिला नंबर असे. ते १८६२ त बी. ए. ची व ऑनर्सची परीक्षा पास झाले व त्यांत त्यांना सोन्याचें पदक व दोनशे रुपयांची पुस्तकें बक्षीस मिळाली. नंतर १८६४ सालों ते एम्. ए. झाले. बी. ए. झाल्यावर दोन वर्षे नवीनच इंदुप्रकाश नांवाचें पत्र निघालें होतें त्याचे त्यांना संपादक नेमिलें. त्यांच्या उत्तम लेखांनी तें पत्र अतिशय लोकमान्य झाले. एम्. ए. झाल्यावर माधवराव एल्किन्स्टन कॉलेजांत प्रोफेतर झाले व शिवाय एल्एल्. बी. चाही अभ्यास करूं लागले. एल्एल्. बी. च्या परीक्षेतही त्यांचा पहिला नंबर आला. याच वेळीं एल्फिन्स्टन कॉलेजांत त्यांनी इतके उत्तम तऱ्हेनें शिकविलें, कीं तेथील विद्यार्थी, प्रोफेसर व प्रिन्सिपाल यांनी त्यांना सन्मानपूर्वक एक तीनशे रुपयांचें सोन्याचें घड्याळ बक्षीस दिले.