पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३)

अगदीं एका कुटुंबांतील प्रेमळ माणसांसारखीं रहात असत. सणवार एकत्र करीत असत. दुरून पहाणाराला हें एकच कुटुंब आहे असे वाटत असे. कीर्तन्यांची मुलें लहानपणापासून हुषार व तरतरीत. पण रानड्यांचा माधव आपला अगदीं थंड व धिमा. त्याला कांहीं समजत नसे. घड निरोपही सांगतां यावयाचा नाहीं. शाळेत परीक्षा झाली म्हणजे कीर्तन्यांची मुलें 'आम्हीं पास झालों, आम्हांला परीक्षक असे असे म्हणाले' वगैरे किती तरी घरीं येऊन सांगत. पण माधवाचें असें कांहींच नाहीं. माधव स्वत: 'मी पास झालों !' असेंसुद्धां कधींच सांगत नसे. कीर्तन्यांच्या मुलांकडून हा पास झाला है समजायचें. 'अरे माधवा, तूं पास झालास हे आम्हांला नाहीं कुठें सांगितलंस,' असें घरच्या माणसांनी म्हटले तर माधव म्हणे 'त्यांत काय सांगायचें आहे ! रोज शाळेत जाऊन आम्ही अभ्यास करतों तर पास होणारच; त्यांत काय जास्त आहे !'

सरळ एकमार्गीपणाची गोष्ट.

 माधवराव लहानपणापासून सरळ व एकनादी असत. त्यांना डावपेंच मुळींच माहीत नसत. एकदां एका गोष्टीला आरंभ केला कीं, ती आपली ह्यांनी करायचीच. त्याबद्दल पुनः त्यांना सांगावें लागत नसे. पण त्यांत कोणीं अडथळा केला, कीं हट्ट धरून हे रडत बसायचे; मग समजूत लवकर व्हावयाची नाहीं. पहिल्यांदा धुळाक्षरांच्या शाळेत घातल्यावर शाळेतून आलेन् आले, कीं घरीं सारा दिवस तेच आपल्याशीं हळूहळू बडबडत बसत, व बोटानें भिंतीवर अक्षरें व उजळणी काढीत रहावयाचे. हीच यांची करमणूक व हाच यांचा खेळ. रस्त्यांत देखील हे धुळींत उजळणी काढीत बसत.

एकमार्गीपणाची आणखी एक गोष्ट.

 माधवरावांची मुंज अगदी लहानपर्णी झाली. तेव्हां ते मराठी शाळेत शिकत असत. शाळा सकाळी असे. शाळा दहा वाजतां सुटत