पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२)

गाडीच्या खडखडाटामुळें मूल पडल्याचा आवाज गाडीवानास ऐकू आला नाहीं. गाडी तशीच मैल दोन मैल पुढे गेली. मागून बऱ्याच अंतरावरून विठूकाका घोड्यावरून येत होते. त्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज रस्त्यावर पडलेल्या या दोन वर्षांच्या माधव बाळानें ऐकला व बाळ विठ्काकांना म्हणाला 'काका, काका मी येथें पडलों आहें.' हे शब्द कानी पडतांच विठकाकांनी घोड्यावरून झटकन् खाली उडी मारली व तें गारठलेलें गरीब बिचारें चाळ आपल्या उबदार पांघरुणांत गुरफटून घेतलें व ते पुनः घोड्यावर बसले. नंतर भरधांव घोडा फेंकून त्यांनी ती बैलगाडी गांठली व माधव बाळाच्या आईस हाक मारून म्हणाले, ' गोपिकावहिनी गाडींत सर्व ठीक आहेना ?' गोपिकावहिनी अर्धवट झोपेंत म्हणाल्या 'ठीक आहे. 'तेव्हां विठकाका पुनः म्हणाले, 'दोनही मुलें तुमच्याजवळच आहेतना ?' हे शब्द ऐकतांच गोपिकावहिनी झटकन उठल्या व इकडे तिकडे चांचपून पहातात तो माधव नाहीं. हे समजतांच त्या अतिशय रडूं लागल्या. तेव्हां पोटाशीं घेतलेलें तें माधवबाळ विठूकाकांनीं गोपिकावहिनींजवळ दिलें, व आज परमेश्वरानें केवढी कृपा केली !' असें ते म्हणाले.

स्वभाव.

 बाळांनों, आपले चरित्रनायक माधवराव यांचा स्वभाव लहानपणापासून अगदर्दी सरळ, निष्कपट, न्यायी व दयाळू होता. लहानपण ते जरासे हड्डीही होते. त्यांच्या बाळपणांतील स्वभावदर्शक कित्येक मजेदार गोष्टी त्यांच्या सुशील सहधर्मचारिणी परमपूज्य श्रीमंत बहिनीबाईसाहेब यांनी आपल्या ' आमच्या आयुष्यांतील कांहीं आठवणी ' या अत्यंत सुंदर पुस्तकांत लिहून ठेविल्या आहेत. त्या बाळांनों, तुम्हांला अतिशय बोधपर व मनोरंजक वाटतील अशी खात्री वाटते म्हणून खालीं देतो:-

निरभिमानदर्शक गोष्ट.

 कोल्हापूर शहरांत कीर्तने माडीवर व रानडे तळमजल्यावर असे एका घरांत रहात असत. या दोनही कटुंबांतील लहानथोर सर्व माणसे