पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११)

खाजगी कारमारी झाले. तेव्हां त्यांना दरमहा २५० रुपये पगार मिळत असे.
 या गोविंदरावांचे चिरंजीव म्हणजे आपले चरित्रनायक. यांचा जन्म माघ शुद्ध ६ शके १७६३ म्हणजे ता० २८ जानेवारी सन १८४२ रोज मंगळवार या दिवशी संध्याकाळी झाला. आपल्या चरित्रनायकाच्या आईचे नांव गोपिकाबाई असें होतें.

माधवरावांचें बाळपण.
प्राणसंकट.

 आपल्यांत एक म्हण आहे कीं, 'दैव तारी त्याला कोण मारी,' याच अर्थाची संस्कृतांतही एक म्हण आहे ती. ही:- " अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं " या म्हणीचा खरेपणा बाळांनों, आतां मीं सांगता त्या गोष्टीवरून तुम्हांला कळून येईल. आपले चरित्रनायक अगर्दी लहान म्हणजे केवळ दोन अडीच वर्षांचे होते त्यावेळची गोष्ट. आपल्या चरित्रनायकाची आई, त्यांना व त्यांच्या धाकट्या बहिणीला बरोबर घेऊन बैलगाडीत बसून निफाडाहून आंबेगांवास येण्यास निघाली. बैलगाडीच्या मागून आपल्या चरित्रनायकांचे चुलत चुलते विठूकाका घोड्यावरून येत होते. हा प्रवास रात्री करावा असें ठरलें. कारण ते कडक उन्हाळ्याचे दिवस होते. ही मंडळी निघाली ती काळोखी रात्र होती. बैलगाडीतील मंडळी बरीच रात्र झाली तशी झोंपी गेली. बैल आपले मनाप्रमाणें गाडी ओढीत चालले होते. रात्रीचे दोन वाजण्याचा सुमार होता. त्यावेळी मोठी उतरण लागल्यामुळे बैलांनी अतिशय वेगानें गाडी एकदम ओढीत नेली. त्या झटक्यासरशी पांघरुणांत गुरफटून निजलेलें है माधब बाळ एकदम पांघरुणासकट खाली पडलें. माधवबाळाची आई गाढ झोंपी गेली होती. यामुळे ही गोष्ट त्या बिचारीला समजली नाहीं.