पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९)

सांगतों ऐका. त्यांचें नांव न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे. या थोर पुरुषाचें चरित्र तुम्हांला अतिशय बोधपर होईल यासाठी ते आतां मी तुम्हांला अगदी सोप्या भाषेत सांगतों. तें तुम्हीं अगदीं चित्त देऊन ऐका व त्या चरित्रापासून उत्तम बोध घेऊन आपलें चरित्र तसेंच चांगले बनविण्याचा प्रयत्न करा.

माधवरावांचे पूर्वज.

 बाळांनों, आपल्यांत एक सर्वसाधारण म्हण आहे. कीं 'खाण तशी माती.' म्हणजे आईबाप, आजाआजी जर्शी असतील तशीं मुलें किंवा नातवंडे व्हावयाचीं. साधारणपणे हा नियम खरा ठरतो. आपले चरित्रनायक माधवराव हे एवढे थोर कसे झाले, एवढे देशभक्त कसे झाले, हे समजण्यासाठी त्यांच्या पूर्वजांची थोडीशी हकीगत सांगणे अवश्य आहे म्हणून ती तुम्हांला थोडक्यांत सांगतों. रानडे घराणे हे मूळचें कोंकणांतलें. त्यांचें मूळ गांव भोभारपाचोरी हें गांव रत्नागिरी जिल्ह्यांत चिपळूण तालुक्यांत आहे. हे अगदर्दी लहानसेंच आहे, पण येथील हवा फारच चांगली आहे व पाणी अतिशय रुचिकर व पाचक आहे. येथील घरें बागांनीं सुशोभित आहेत. या बागांत सुंदर पोफळींचीं सरळ व उंच झाडें डोळ्यांना फार आनंद देतात. त्याचप्रमाणे या बागांत नारळीचीही पुष्कळ झार्डे आहेत. नारळीच्या झाडांनां कोंकणांत माड असें म्हणतात. याशिवाय प्रत्येकाच्या घराभोंवत आंबराई असायचीच. या गांवांतील ईश्वरानें निर्माण केलेले व झुळझुळ वहाणारे स्वच्छ, शुद्ध व पाचक पाण्याचे झरे, तीं सुंदर पोफ- ळींचीं, माडांचीं व आंब्या फणसांची झाडें, कुंपणावरून फुलांनी भरलेल्या वाऱ्याच्या झुळुकेबरोबर खेळत असलेल्या हंसणाऱ्या वेली, तेथील गांवक-यांना प्रफुल्लित करितात, त्यांचीं शरीरें ताजीतवानीं करतात; व त्यांची मनें आनंदाने दुमदुमून टाकतात. यामुळे जरी कोकण अगदीं गरीब आहे तरी तें सृष्टिदेवीचें लाडकें बाळ आहे, सृष्टिदेवी-