पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)

पवित्र बनविली आहेत, त्यांच्या मनांत देव रहातो. त्यांचें मन म्हणजे देवाचें फार आवडतें मंदिर, ही गोष्ट मीं तुम्हांला कृष्णचरित्रांत सांगितलीच आहे. आतां बाळांनों, तुमच्यापैकी जे आपलें वर्तन अतिशय शुद्ध ठेवती, दुर्गुणांचें वारेंही स्वतःला लागूं देणार नाहीत, पवित्र विचारांनीं, सत्कृत्यांनी व सद्गुणांनी जे आपले शरीर व मन अतिशय सुंदर, निर्मळ व पवित्र बनवितील त्याचे हृदयांत देव येऊन राहील. आतां देव ज्यांच्या हृदयांत नेहमीं राहातो त्यांचें दर्शन झालें म्हणजे देवाचेंच दर्शन झालें, खरें ना ? तर मग हल्लीं देखील अशा पुण्यवान् पुरुषांचें आपल्याला दर्शन होतें म्हणजे अर्थात देवाचेही दर्शन होतें. शिवाय देवरायाच्या मूर्तीचें दर्शन मंदिरांत जाऊन घेतल्यानेंही मन पवित्र होते. असो. तेव्हां ' दया क्षमा शांति, तेथें देवाची वसती ' है जें तुकाराम महाराजांनी म्हटले आहे ते अक्षरश: खरें आहे. तेव्हां देव कोठें राहातो हें तुम्हांला समजले. आतां संत कोणाला म्हणावें हैं तुकारामबोबांनी सांगितले आहे; ते म्हणतात तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात ' म्हणजे जगांतील लोकांनी जरी अतिशय निंदा केली, त्रास दिला, टवाळी केली, वाटेल तसा छळ केला, खोटेंच आरोप केले तरी हैं सर्व शांतपणे जो सोसतो तोच संत. असल्या तऱ्हेचे एक संत, अगदर्दी अलीकडे या आपल्या महाराष्ट्रांत होऊन गेले. त्यांनी स्वदेशाची स्थिति सुधारण्यासाठी फार मेहनत घेतली, शरीर झिजविलें, स्वधर्माचा उत्कर्ष करण्यासाठी अतोनात खटपट केली, दुसन्याचें दुःख निवारण्यासाठी व संकटांत सांपडलेल्यांना मदत करण्यासाठी नेहमीं तत्परता दाखविली. देशाची स्थिति सुधारण्यासाठी अनेक चळवळी व अनेक संस्था आपल्या बुद्धिचलानें व मेहनतीनें निर्माण केल्या, परंतु आपलें नांव बिलकूल पुढें येऊं दिलें नाहीं. हे संत दया, क्षमा व शांती यांचें जणूं काय माहेरघरच होतें. आणि म्हणूनच तुकारामबोवांच्या अभंगवाणीप्रमाणें त्यांच्याजवळ देव नेहमीं वसती करीत होता. असले थोर सत्पुरुष कोण म्हणाल तर