पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. 20400- S बाळांनों, आमचें चरित्रकथन संपले. • सुजनचरित्रें परम पवित्रे सादर वर्णावीं ' अशी कवीश्वरांची आज्ञा आहे ती मान्य केली. सुजनचरित्रें वर्णन केल्याने मन प्रसन्न व पवित्र होतें हें माझ्या अनुभवास आलें. सुजनचरित्रांचें श्रवण करून तुम्हांलाही अतिशय आनंद झाला असावा असें तुमच्या चेहऱ्यावरून दिसतें. काय म्हणतां ? ' अतिशय आनंद झाला ' ठीक आहे. बाळांनों, ह्या थोर पुरुषांचीं उज्ज्वल चरित्रें मीं तुझांला सांगितलीं तीं तुम्हीं मन लावून ऐकिलीं. आतां सांगा पाहूं मी या थोर पुरुषांना 'महाराष्ट्राचे पंचप्राण' असें म्हटलें ते बरोबर आहेना ? काय म्हणतां अगड़ीं बरोबर आहे ? बरें तर असलीं माण आपल्या कीर्तिरूपानें अजरामर होतात ना ? अजरामर झालेले महाराष्ट्राचे पंचप्राण' असें जें मीं यांना म्हटलें तेही योग्यच आहे. तर मग 6 असो. बाळांना, 'अजरामर झालेल्या या महाराष्ट्राच्या पंच- प्राणांच्या चरित्राचें पुनः पुनः वाचन करीत जा, त्यांच्या चरित्राचे मनन नेहमीं करा, म्हणजे त्यांच्या थोर गुणांचें सहजच तुम्ही अनुकरण कराल आणि मग तुम्ही सर्वांना प्रिय व्हाल. बाळ मित्रांनो, कादंबऱ्यां तील अद्भुत व कल्पित गोष्टी वाचण्याचें व्यसन तें लवकर सोडा व सज्जनांचीं सन्मार्गदर्शक चरित्रें वाचण्य जोडा. मीही तुम्हांला वेळोवेळीं अशींच आणखी संत चरित्रें पुनः का तरी सांगेन. इतकें सांगून व देव तुम्हांला सुशील, सद्गुणी व सुविद्य करो, अशी त्या दयाळू परमेश्वराची नम्रपणें प्रार्थना करून तूर्त तुमचा निरोप घेतों. समाप्त.