Jump to content

पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११५) अत्यंत आवडीचा खेळ म्हटला म्हणजे पत्ते. एक तर ते एकसारखे १४ तास पत्ते खेळले. विलक्षण निर्लोभता. त्यांचे अंगीं विलक्षण निर्लोभता होती. लॉर्ड मोर्ले यांनी त्यांना स्टेट सेक्रेटरीच्या कौन्सिलांत पहिला हिंदी सभासद नेमण्याचें योजिलें होतें. पण त्या मोठ्या थोरल्या पगाराला किंवा मानाला नाम- दार मुळींच भुलले नाहीत. ते म्हणाले, मी जन्मभर भारतभूमातेचा सेवक राहणार. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पंचम जॉर्ज बादशहांनी त्यांना सर पदवी देऊं केली होती. पण तीही त्यांनी नम्रपणे नाकारली. त्यांना भारत सेवक हीच पदवी हवी होती व तीच त्यांनीं जन्मभर धारण केली. प्रोफेसर म्हणवून घेणेंही त्यांना आवडत नसे.