पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११४) होते. त्यांचे यथायोग्य वर्णन करणें माझ्या शक्तीच्या बाहेरचें आहे यासाठीं बाळांनो, त्याच्या चरित्राचे मनन करा व त्यांचेप्रमाणें हो- ब्याचा प्रयत्न करा असें माझें तुम्हांला सांगणें आहे. त्यांची कुटुंबांतील मंडळी. त्या आपल्या नामदार गोखले यांची प्रियपत्नी त्यांच्या पूर्वी सुमार सोळा वर्षे मरण पावली. त्यांचे मागें त्यांच्या दोन प्रिय सुशील कन्या होत्या. त्यांपैकीं धाकट्या कु. गोदूबाई नेहमी आजारी असत. वडिलांच्या मृत्यूनंतर लवकरच मरण पावल्या. नामदारांच्या ज्येष्ठ कन्या कु. काशीताई या फार सुशील व सद्गुणी आहेत. त्यांची बी. ए. ची परीक्षा उत्तम तरहेनें पास झालेली आहे. सुदैवाने त्यांच्या अनुरूप अशा रा. शंकरराव ढवळे, आयू. सी. एस. यांच्याशी त्यांचा विवाह सन १९१८ सालीं झाला. आतां त्या सौ. आनंदीबाई ढवळे बनल्या आहेत. नामदार गोखले यांना मुलगा नाहीं. पण सौ. आनंदीबाई ढवळे यांना दो मुलगे झाल्यामुळे नामदा- रांना नातू प्राप्त झाले आहेत. याशिवाय नामदारांना पुष्कळ पुतणे, पुतण्या व भाचे, भाच्या आहेत. त्या सर्वोचा ते चांगला परामर्ष घेत असत. नामदार गोखले यांचे आवडीचे विषय. सर्व लोकांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीने द्यावें असें, ना. गोखले याना फार वाटत असे व त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सारखे चालू असत. त्यांचा दुसरा आवडीचा विषय हिंदूमधील सात कोट अस्पृश्य लोकांचा उद्धार करून त्यांच्याशी प्रेमानें व समतेनें वागावयास देश- बंधूंना शिकवावे हा होता. ना. गोखले यांचे आवडते खेळ. तरुणपणीं नामदारांना क्रिकेट व टेनिस खेळण्याचा फार नाद होता. पण पुढे त्यांना बिलिअर्ड आवडूं लागला. त्यांचा