पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११३) जवळच स्थापन केली आहे. न्या. रानडे यांचें विस्तृत चरित्रही नाम- दारांच्या मनांतून लिहावयाचें होतें. तें त्यांनी लिहिलें असतें तर मोर्ले यांनी लिहिलेल्या ग्लाडस्टन यांच्या चरित्राइतकें तें उत्कृष्ट झाले असतें. पण आपल्या दुर्दैवानें नामदारांना वेळ मिळाला नाहीं. बाळांनों, पाहिलीतना ना. गोखले यांची गुरुभक्ती ? बाळांनों, नामदारांच्या प्रमाणेच आपल्या गुरूंवर प्रेम कर व त्यांचेविषयीं आदर व भक्ति मेहमीं आपले मनांत ठेवा. नामदार गोखले यांचा दुसरा अलौकिक गुण म्हणाल तर त्यांचा अचाट स्वार्थत्याग. वयाच्या अठराव्या वर्षीपासून स्वसुखाची व स्वतः पैसे मिळवून श्रीमंत होण्याची पर्वा न करितां सर्व आयुष्य त्यांनी स्वार्थत्यागपूर्वक स्वदेशाच्या सेवेस अर्पण केलें. बाळांनो, याचें तुम्ही अनु- करण करा. नामदारांचा तिसरा अनुकरणीय गुण म्हणजे त्यांची सतत उद्योग करण्याची संवय. बाळांनो, नामदारांप्रमाणे आपले हातून अलौकिक कामागरी व्हावी असे तुम्हांला वाटतें ना ? तर त्यांच्या प्रमाणे उद्योगी व्हा. नामदारांचा चवथा मोठा गुण त्यांचा गोड स्वभाव. नामदार नेहर्मी हसतमुख असत व फार प्रेमळपणाने व प्रेमळ शब्दांनी आपले विचार प्रदर्शित करीत असत. एखादे वेळेस रागाने एखाद्या क्षुल्लक नोक- राला जर ते बोलले तर लगेच त्यांना वाईट वाटे व ते त्याला गोड शब्दांनीं बोलून व कधीं कधीं तर त्याची क्षमा मागून प्रसन्न करीत. बाळांनों, नामदारांप्रमाणे प्रेमळ भाषण व प्रेमळ स्वभाव बनवा. कठोरपणा हैं एक ब्यंग आहे, तें आपण कधींही जडवून घेऊं नये. नामदारांचा पांचवा गुण म्हणजे त्यांची स्वदेशभक्ति तरुण वयांत बायको मेली असता त्यांनी सर्व आयुष्य देशसेवेला देतां यावें म्हणून पुन: लग्न केलें नाहीं. अहोरात्र देशाचे कल्याण कसे होईल याची त्यांना चिंता लागलेली असे. असे अनेक सद्गुण नामदारांचे अंग