पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११२) अतिशय हानि झाली आहे, असे सांगून तरुण मंडळीला ना. गोखल्यांच्या प्रमाणें आपलें चरित्र उज्वळ करा, असा त्यांनीं उपदेश केला. गुरुवर्य डॉ. भांडारकरांनींही कळवळ्याचें भाषण केलें. नंतर दहनविधि झाल्यावर हळहळत तो प्रचंड जनसमुदाय परत फिरला. ना. गोख- त्यांची मृत्युवार्ता समजतांच सर्व खंडांतून दुःखप्रदर्शक सहानुभूती- च्या तारा व पत्रे यांचा ना. गोखले यांच्या कुटुंबावर व त्यांच्या सोसायटीवर सारखा वर्षाव झाला. राजापासन रंकापर्यंत सर्वांनी आपलें दु:ख प्रदर्शित केलें. खुद्द बादशहा पंचम जॉर्ज, हिंदुस्तानचे स्टेट सेक्रेटरी, व्हाइसरॉय वगैरे थोर माणसांनींही दुःखप्रदर्शक तारा नामदारांच्या कुटुंबाकडे पाठविल्या. ज्याच्या मृत्यून सर्व जग दुःखितः झालें तोच खरा थोर पुरुष. असला थोर पुरुष आपल्याला लाभला है। आपले मोठेंच भाग्य. अलौकिक गुण. ना. गोखले यांच्या अंगीं अनेक अलौकिक गुण होते. पण त्या सर्वात पहिले स्थान मी त्यांच्या गुरुभक्तीला देतों. न्या. रानडे, हे त्यांचे गुरु. त्यांचेविषयीं ना. गोखले यांना इतकी भक्ति व प्रेम वाटत असे कीं, न्यायमूर्तीची आज्ञा ते नेहमीं आदरपूर्वक पाळीत असत. व अनेक वेळां सार्वजनिक भाषणांत व खासगी भाषणांत शेवटपर्यंत, माझे परमपूज्य गुरुवर्य असा त्यांच्याबद्दल उल्लेख करीत असत. न्यायमूर्ति रानडे यांचेविषयीं ना. गोखले यांची भक्ति किती उत्कट होती हैं जर बाळांनों, तुम्हांला पहावयाचे असेल तर ना. गोखले यांनी श्री. रमाबाईसाहेब रानडे यांनी लिहिले- ल्या ' आमच्या आयुष्यांतील कांहीं आठवणी' या सुंदर पुस्तकाला जोडलेला ना. गोखले यांचा प्रस्तावनालेख वाचा. आपले पूज्य व प्रिय गुरु न्या. रानडे यांचे स्मारक करण्याकरितां ना. गोखले यांनीं फंड जमविला व 'रानडे एकॉनॉमिक इन्स्टिट्यूट ' या नांवाची औद्योगिक व अर्थशास्त्रविषयक संस्था ' सर्व्हेटस् ऑफ इंडिआ सोसायटी' '