पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१११ ) मिळविण्यासाठीं व रिपोर्ट करण्यासाठी ' पब्लिक सर्व्हिसेस कमिशन' या नांवाचें एक कमिशन सन १९९३ सालीं विलायत सरकारानें नेमिलें. त्या कमिशनवर हिंदी लोकांचे प्रतिनिधी म्हणून ना. गोखले यांची नेमणूक झाली. १९९३ सालीं ठिकठिकाणी हिंडून या कमिशननें माहिती गोळा केली. त्यावेळीं साक्षीदारांची उलटतपासणी उत्तम त हेर्ने करून हिंदुस्तानास हितकर असे जबाब साक्षीदारांच्या तोंडून ना. गोखले यांनी मोठ्या हुशारीनें वदविले. नंतर तें कमिशन व ना. गोखले खल करून रिपोर्ट लिहिण्या- साठी विलायतेस १९९४ सालीं गेले. तेथें ना. गोखले यांची प्रकृति बरीच बिघडली, यामुळे त्यांना हिंदुस्तानांत परत यावें लागले. हिंदुस्ता- नांत आल्यावरही ना. गोखले यांची प्रकृति दिवसानुदिवस खाला- वतच गेली. त्यांना मधुमेह नांवाचा रोग जडला होता. तो बळावला व सन १९९५ सालीं फेब्रुवारी महिन्याच्या १९ तारखेस रात्री ११ वाजतां त्यांचें त्यांच्या प्रिय भारतसेवकमंडळाच जागेंत प्राणोत्क्रमण झालें. पौर्णिमेचा सुखदायक चंद्रमा एकदम अस्तास गे यामुळे सर्व देश दुःखाच्या अंधारांत बुडून गेला. दुःखप्रदर्शन व सहानुभूति. तारीख २० फेब्रुवारी रोजी सकाळीं ना. गोखले यांची प्रेत- यात्रा सर्व्हेटस ऑफ इंडिआ सोसायटीतून सुमारें अकरा वाजतां निघाली. दुःखानें विव्हळ झालेले त्यांचे पुणे शहर त्यांच्या दर्शनासाठी सर्व्हेटस् ऑफ इंडिआ सोसायटीकडे लोटलें होतें. पुण्यांतील हजारों लहान थोर, सुशिक्षित व अशिक्षित माणसें या आपल्या पंचप्राणांपेक्षांही प्रिय महाभागाचे दर्शन घेण्यासाठी भारतसेवकसमाजाचे आवारांत गोळा झाले होते. त्या प्रचंड जनस जासह नामदारांची प्रेतयात्रा ओंकारेश्वरीं आली. एवढें प्रचंड वाळवंट पण माणसांनी अगदीं फुलन गेलें होतें. लोकमान्य टिळक यांनीं अश्रुपूर्ण नेत्रांनी व गहिवरून येऊन ना. गोखल्यांचें गुणवर्णन केलें व त्यांच्या मृत्यूने देशाची