पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११०) गोखले यांच्या उत्तम देशसेवेमुळे त्यांना हे बक्षीस व हा बहुमान मिळाला. त्यांना काशी येथे भरलेल्या १९०५ सालच्या राष्ट्रीय सभेचें अध्यक्ष नेमण्यांत आलें होतें. त्यावेळचें त्यांचें भाषण व कामगिरी सर्व देशाला फारच पसंत पडली. इंग्लंडची दुसरी सफर. मागें विलायतेंत जाऊन वेल्बी कमिशनपुढे उत्तम साक्ष देऊन ना. गोखले यांनी १८९६ सालीं लोकांकडून धन्यवाद मिळविला. त्यापेक्षाही मोठ्या कामगिरीसाठीं आतां म्हणज १९०६ सालीं ना. गोखले इंग्लंडास गेले. तेथे जाऊन त्यांनी लॉर्ड मोर्ले हिंदुस्तानचे त्यावेळचे स्टेट सेक्रेटरी यांची वारंवार भेट घेतली व त्यांचेपासून 'मोर्ले. मिंटो रिफॉर्मस्' म्हणजे स्वराज्याचा पाया घालणाऱ्या सुधारणा हिंदु- स्तानासाठी मिळविल्या. दक्षिण आफ्रिकेची सफर. यानंतर लवकरच ना. गोखले यांना दक्षिण आफ्रिकेत जाव लागले. दक्षिण आफिर्केत रहावयास गेलेले लोक तेथील गोरे लोकांचे डोळ्यांत सलूं लागले. यामुळे तेथील सरकार हिंदी लोकांना योग्य रीतीनें व न्यायानें वागवीनात. तेव्हां दोनही पक्षांत समेट करण्याचा प्रयत्न करावा या हेतूनें ना. गोखले, प्रकृति बरोबर नसतांही सत्कार्य करावयास सांपडतें म्हणूनच दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे आपल्या प्रेमळ मुत्सद्देगिरीनें व गोड स्वभावानें त्यांनी दोनही पक्षांना आपलेसें करून घेतलें व शेवटीं दोनही पक्षांत समेट व प्रेम जुळवून आणून ते यशस्वी होऊन हिंदभूमला परत आले. इंग्लंडची तिसरी सफर. हिंदुस्तानांतील लोकांना स्वदेशांतील कारभारांतील वरच्या दर्जा- च्या जागा द्याव्या किंवा नाहीं, त्या जागांना ते पात्र आहेत कीं नाहीं, सरकारी कामदारांत देशी किती असावे वगैरे प्रश्नांसंबंधी माहिती