पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०९) सभासद म्हणून निवडून पाठविलें. वरिष्ठ कौन्सिलांत सन १९०१ पासून तो शेवटपर्यंत ते मेंचर होते. तेथेंही आपल्या वादविवादांतील हुषारीनें, गोड भाषणानें, आंकडेश/स्त्रांतील व अर्थशास्त्रांतील नैपुण्यानें सर्व सभासदांना त्यांनीं चकित करून सोडलें. तेथील त्यांच्या कामगिरी आपल्या देशाचा पुष्कळ फायदा झाला आहे. अध्यापनाची अखेर. ना. गोखले यांनी सन १८८५ पासून सन १९०४ अखेर म्हणजे वीस वर्षे फर्ग्युसन कॉलेजांत प्रोफेसरचें काम उत्तम तव्हेनें करून लाईफ मेंबरनें वीस वर्षे काम केले पाहिजे असा जो नियम आहे त्याची पूर्तता केली. पुढ अधिक महत्त्वाची कामें अंगावर पडल्यामुळे त्यां आपल्या प्रिय कॉलेजचा निरोप घेतला. त्या प्रसंगी त्यांना व त्यांच्या प्रिय विद्यार्थ्यांना व बरोबरच्या प्रोफेसरांना अतिशय वाईट वाटलें. सर्व्हटस् ऑफ इंडिआ सोसायटी. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षणाचें काम करीत असतां ना. गोखले यांना नेहमीं असे वाटत असे कीं, याच नमुन्याची पण राजकीय, सामाजिक, औद्योगिक वगैरे कामगिरी करणारी एक सोसायटी असावी. पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीत वीस वर्षे उत्तम काम करून ती सोडल्यावर या त्यांच्या मनातील विचाराप्रमाणें ता. १२ जून सन १९०५ साली त्यांनी ' सईंटस् ऑफ इंडिआ सोसायटी ' म्हणजे 'भारतसेवकमंडळ' या नांवाची एक संस्था काढली. त्या संस्थेत हल्ली सुमारें २० सभासद आहेत. व ते राजकीय, सामाजिक, औद्यो- गिक वगैरे बाबतींत उत्तम देशसेवा करीत आहेत. या संस्थेचें मुख्य ठिकाण पुणे येथें आहे व तिच्या शाखा मुंबई, मद्रास, नागपूर व अलाहाबाद येथें आहेत. राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष. देशाची उत्तम सेवा करणाराला एक उत्तम बझीस देण्य. चें देशाचे हातांत असत. तें बक्षीस म्हणजे राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष करग. ना.