पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०८) केवळ वीस वर्षांचे होते तेव्हांपासूनच करावयास लागले. हें काम न्या. रानड्यांच्या दिव्य प्रेरणेच्या मदतीने त्यांनीं उत्तम तरहेनें केलें. त्याच- प्रमाणे राजकीय विषयांचे सार्वजनिक सभेचें मासिकही त्यांनी उत्तम तऱ्हेनें चालविलें, याचे कारण न्यायमूर्ति हे उत्तम गुरु व गोखले हे उत्तम शिष्य अशी जोडी जुळून आली हेच होय. वेल्बी कमिशन. ज्या गोष्टीनें ना. गोखले यांचें नांव सर्व हिंदुस्तान व इंग्लंडभर दुमदुमून राहिले ती गोष्ट त्यांची वेल्बी कमिशनपुढे झालेली उत्तम साक्ष ही होय. हिंदुस्तानावर खर्चाचा बोजा फार पडत आहे, त्यापैकी बराच खर्च कमी करतां येण्यासारखा आहे, हिंदुस्तान गरीब आहे त्याला, हे ओ सहन होणार नाहीं, अशी राष्ट्रीय सभेनें सारखी ओरड केल्यामुळे विलायत सरकारनें यासंबंधी चौकशी करण्याकरितां वेल्वी कमिशन नेमिलें. त्या कमिशनपुढे सन १८९६ सालीं पुष्कळांच्या विलायतेंत साक्षी झाल्या. पण सर्वोत ना० गोखले यांची साक्ष उत्तम झाली. यामुळे इंग्लंड व हिंदुस्तान या दोनही देशांत त्यांची फार वाहवा झाली. म्युनिसिपल प्रेसिडेंट. ना. गोखले यांनी ज्याप्रमाणे शिक्षणसेवा व देशसेवा केली त्या- प्रमाणेच अतिशय कळकळीनें आपल्या पुणे शहराचीही सेवा केली. ते बरीच वर्षे पुर्णे म्युनिसिपालिटीचे सभासद होते व पुढें तर एकमतानें त्यांना प्रेसिडेंट निवडण्यांत आलें. ते म्यु० प्रेसिडेंट असतां त्यांनीं नेहमींची या कामांतील सुस्ती व दिरंगाई काढून टाकली. पुढे मोठालीं कामें अंगावर पडल्यामुळे त्यांना हें काम सोडावें लागलें. कौन्सिलचे मेंबर. मुंबई इलाख्यांतील मध्यभागानें सन १८९९ साली आपले तर्फे सभासद म्हणून त्यांना मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलांत पाठविलें. तेथें त्यांनी दोन वर्षे इतकें उत्तम काम केलें कीं, त्या कौन्सिलानें त्यांना हिंदुस्तान सरकारच्या वरिष्ठ कौन्सिलांत आपले वतीचे