पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०७ ) आंकड्यांनीं खच्चून भरलेले जेव्हां पुढे मांडीत तेव्हां इतर मेंबर त्या आंकड्यांवर फारसे तुटून पडत नसत. पण अर्थशास्त्र, इतकेच नव्हे तर गणिती अर्थशास्त्र या विषयांत गोखले पारंगत असल्यामुळे ते तेव्हांच फडणिसांच्या चुका त्यांच्या पदरांत घालीत व त्याही त्यांच्या सरकारी `रिपोर्टोतील आंकड्यांच्याच जोरावर. अलौकिक गुरूचे अलौकिक शिष्य असे म्हणतात कीं, खऱ्या ब्राह्मणानें नेहमीं षट्कर्मे केली पाहिजेत. तीं कोणतीं तर १ यजन, २ याजन, ३ अध्ययन, ४ अध्यापन, ५ दान, ६ प्रतिग्रह. हीं सहाही कर्मे अत्यंत उज्वळ रीतीनें निस्वार्थी बुद्धीनें गोपाळरावांनीं केलीं. यामुळे ते इतरांप्रमाणे जन्मानें ब्राह्मण होतें, पण शिवाय दिव्य कृतीनेही ब्राह्मण होते. आपल्या स्वार्थबुद्धीचा होम करून त्यांचें यजन चाललें होतें. इतर तरुणांना स्वार्थाचा होम करावयास शिकवून व त्यांचेकडून स्वार्थत्याग करवून त्यांनी याजन केलें, अध्ययन म्हणजे विद्या संपादन करणें हें त्यांनी लहानपणी तर केलेच पण मोठेपण स्वतः प्रोफेसर होऊन अध्यापन म्हणजे इतरांना शिक- विण्याचे काम करीत असतांना देखील त्यांचें अध्ययन म्हणजे न्या.. रानडे, यांचे पायांशी बसून राजकीय विद्येचें संपादन चाललेंच होतें. दानाविषयीं त्यांची ख्यातीच आहे. प्रतिग्रह म्हणजे दान घेणें हेही फर्ग्युसन कॉलेजचा फंड गोळा करतांना त्यांना करावेंच लागले.. असो. आतां मुख्य सांगावयाची गोष्ट ही कीं, प्रोफेसरचें काम करीत असतांही आपल्या अंगांतील सतत उद्योग करण्याच्या संवयीनें ना. गोखल्यांनी न्या. रानडे यांचेकडे जाऊन त्या थोर व श्रेष्ठ गुरूजींची मर्जी संपादन करून त्यांचेपासून राजकीय विद्या संपादन केली ही होय. सन १८८६ पासून ते सन १८९६ पर्यंत न्या. रानडे यांच्या- पासून ना. गोखल्यांनीं राजकीय चळवळ, लेखन व कामगिरी या संबंधी विद्या संपादन केली. हिंदुस्तानांतील ज्या प्रसिद्ध नांवाजलेल्या राजकीय संस्था आहेत त्यांपैकी पुण्याची ' सार्वजनिक सभा ' ही आहे. असल्या महत्त्वाच्या सभेच्या सेक्रेटरीचें काम ना. गोखले हे 6