पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०६) विषय त्यांना उत्तम तऱ्हेनें शिकवितां येत असत व यामुळे ते आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रिय असत. त्यांचा सर्वांत आवडीचा विषय अर्थशास्त्र असे. अर्थशास्त्रावर नवीन प्रकाश पाडणारा व नवीन सिद्धांत प्रस्थापित करणारा एखादा उत्तम ग्रंथ आपण लिहावा असें त्यांचे मनांत फार होतें पण त्यांचेवर कॉलेजचा फंड जमविण्याचें फार मह त्वाचें काम पडल्यामुळे व पुढें आगरकर, आपटे, केळकर यांचे मृत्यूमुळें कॉलेजच्या व्यवस्थेचाही सर्व भार त्यांचेवर पडल्यामुळे त्यांना वेळ झाला नाहीं, यामुळे असल्या उत्तम ग्रंथास आपण कायमचे अंत- रलों. अर्थशास्त्राचे खालोखाल त्यांच्या आवडीचा विषय म्हटला म्हणजे इंग्लंडचा इतिहास. इंग्लंडचा इतिहास शिकवीत असतां ते अगदीं तन्मय होऊन जात. इंग्लंडांतील राजसत्ताक कारभार हळूहळू प्रजा- सत्ताक कसा झाला है ते फारच मार्मिक तऱ्हेनें समजून सांगत असत. हिंदुस्तानचा इतिहास म्हणजे गुलाम घराणे, तघलख घराणे, लोदी घराणे असल्या नुसत्या हाणामारीनें व उलथापालथीनें भरलेला असल्या- मुळे तो त्यांना विशेषसा आवडत नसे. ते इंग्लिश इतकें पद्धतशीर शिकवीत कीं, अतिशय मंद मुलाला देखील त्या विषयांत पास होतां यावें. गणितही ते चांगले शिकवीत असत. त्यांनी रचलेलें अंकगणिता- वरील पुस्तक आज तीस पसतीस वर्षे सर्व हिंदुस्तानभर व हिंदुस्तानच्या बाहेरही किती लोकप्रिय झाले आहे हे बाळांनो, तुम्हांला माहीत आहेच. त्यांच्या गणितशास्त्रांतील नैपुण्याचा त्यांना पुढें फार उपयोग झाला. गणितशास्त्राचा अभ्यास मनुष्याला कांटेतोल बनवितों. गणित- शास्त्राचा अभ्यास न केलेले लोक अघळपघळ व सर्वसाधारण वाटेल तशा वायफळ गप्पा मारण्यांत हुषार असतात, पण त्यांचे भाषणांत आंकड्यांच्या वाटेल तशा चुका खच्चून रलेल्या असतात. गोखल्यां- चीं कौन्सिलांतील भाषणें जीं इतकीं कांटेतोल व बिनचूक होत असत त्याचे कारण त्यांचें गणितशास्त्रांतील नैपुण्य हेंच होय. त्याचप्रमाणे बजेट ऊर्फ पुढील सालचे अंदाजपत्रक हिंदुस्तान सरकारचे फडणीस