पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०५ ) सरकारी अधिकारी झाले असते. पण त्यामुळे देशाचें अतोनात नुकसान ·झालें असतें. ते एल. सी. ई. होऊन सडका बांधण्याचे बडे प्रेसिडेन्सी एंजीनिअर होऊन तीन तीन हजार रुपये दरमहा कमावते; पण मग राष्ट्राची भाग्योदयाची यशस्वी सडक बांधणारा यशस्त्री व कुशल एं- जीनिअर त्यांना होतां आलें नसतें व राष्ट्राचें अतिशय नुकसान झालें असतें. ते वकील झाले असते तर आपल्या गोड व कुशल भाषणानें न्यायदेवतेला आपलीशी करून आपल्या पक्षकारासारखा निकाल करून घेऊन पांच सहा हजार रुपये दरमहा पदरांत पाडून गब्बर झाले असते हें खरें, पण मग त्यांचेसारखा यशस्वी, समयज्ञ, मधुर व मुद्देसूद भाषणानें आपले काम फत्ते करणारा हिंददेवीचा राष्ट्रीय वकील नाहींसा झाला असता, त्याची वाट काय ? पण तर्से कांही झाले नाहीं हें फार चांगलें झालें. विचार करता करतां टिळक व आगरकर यांचें चरित्र व देशसेवा त्यांचे डोळ्यांपुढे उभी राहिली. लगेच त्यांचा निश्चय झाला व ते आगरकर व टिळक यांना येऊन मिळाले. फर्ग्युसन कॉलेजांत शिक्षक. सन १८८५ सालीं जानेवारी महिन्यांत लो. टिळक, प्रि. आगरकर, आपढे, नामजोशी वगैरे तेजस्वी तरुणांच्या डेक्कन एज्यु- केशन सोसायटींत गोखले येऊन मिळाले. व त्या सोसायटीचे लाईफ मेंबर झाले. त्यांना पहिले प्रथम न्यू इंग्लिश स्कूलमधें इंग्रजी शिकवावें लागे; पण लवकरच फर्ग्युसन कॉलेजमधें त्यांची इंग्रजीचे प्रोफेसराचे जागीं नेमणूक झाली. वास्तविक गणित विषय घेऊन ते बी. ए. झाले होते. तरी पण त्यांची बुद्धि इतकी चलाख होती कीं, हां हां म्हणतां एखादा नवीन विषय ते आपलासा करीत व विद्यार्थ्यांना तो उत्तम तऱ्हेनें शिकवीत. अशा तव्हेनें मेहनत घेऊन वाटेल तो विषय तयार करून ते हौशीनें शिकवीत असत. यामुळे कॉलेजच्या कामांत त्यांची फार मदत होत असे. अशा तऱ्हेनें त्यांनी कॅॉलेजमघें इंग्लिश, गणित, तिहास व अर्थशास्त्र हे विषय निरनिराळ्या वेळीं शिकविले. सर्वच