पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०४ ) अबोल व सांधे असत अशी गोपाळरावांची ख्याति होती. त्यांची बुद्धि साधारणच होती पण ते महत्त्वाकांक्षी होते व आपण नांव मिळवावें असें त्यांना नेहमी वाटत असे. यामुळे आळस त्यांना कर्धीही शिवला नाहीं. निश्चय व मेहनत याच्या बळावर साधारण बुद्धीचा मनुष्य कसा पुढे येतो, देशाचा उज्ज्वल देशभक्त व सन्माननीय पुढारी कसा बनतो व राजा व प्रजा यांचेकडून कसें धन्य धन्य म्हणवून घेतो हें गोपाळरावांच्या चरित्रा- वरून बाळांनो, आपणाला चांगले कळून येतें. कॉलेजमध्ये असतांना गोपाळरावांची त्यांच्या अलौकिक स्मरणशक्तीबद्दल मोठी ख्याति होती. मोठमोठाली इंग्रजी काव्यें अथपासून इतिपर्यंत त्यांनी बिनचूक व उत्कृष्ट तऱ्हेनें म्हणून दाखवावीं व आपल्या वर्गबंधूंना थक्क करून सोडावें. इतकी दांडगी स्मरणशक्ति फारच थोड्यांच्या वांट्यास येते. आपली अलौकिक स्मरणशक्ति अभ्यासानें गोपाळरावांनीं पुढें इतकी वाढवली की एकदां वाचलेला लेख ते जशाचा तसा वाटेल तेव्हां म्हणून दाखवीत. ही अलौकिक स्मरणशक्ति पुढें व्हाइसरॉय यांच्या कौन्सि- लांत काम करीत असतांना विशेषतः वादविवादाचे वेळीं त्यांना फारच उपयोगी पडली. सरकारी फडणिसांना त्यांच्याच सरकारी रिपोर्टोतले कित्येक वर्षांचे आंकडे धडाधड सांगून गोपाळराव निरुत्तर करून टाकीत. एंजीनिअर, वकील कां देशसेवक. बी. ए. झाले तेव्हां गोपाळराव त्यांच अगदीं लहान वय होतें. नुकती कोठें त्यांना १८ वर्षे पुरीं झालीं होतीं., इतक्या लहान वयांत पुढे काय करावयाचें हा प्रश्न त्यांचे पुढे येऊन राहिला. कोगी म्हणूं लागले तुझी कर्ज काढूनही विलायतेस जा व सिव्हिल सईंट होऊन या. कोणी म्हणत तुझी एल्. सी. ई. होऊन एंजी- निअर व्हा. कोणी म्हणत तुझी एल्एल. बी. होऊन वकील बना. असा निरनिराळा उपदेश ऐकून गोपाळराव अगदीं गोंधळून गेले. सरकारी नोकरींत ते शिरते तर त्यांचा पैशाच्या दृष्टीनें फायदा झाला असता. ते बड़े