पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६)

सोप्या शब्दांनी सांगितलें आहे बरें ! थोर देवभक्त तुकाराम महाराज म्हणतात 'जर तुम्ही मला देव कोठें आहे तो दाखवा पाहूं असें म्हणालां तर तो दाखविणे मला मुळींच कठीण नाहीं.' आतां बाळांनों, तुम्ही म्हणालांत ' छे ! या कलियुगांत देव मुळींच दिसत नाहीं.' पण बाळांनो, एकतर सत्ययुग असो किंवा कलियुग असो सर्व युगे देवाचींच ना ? बरें मग एका युगांत देवानें मनुष्यांस दर्शन द्यावें व दुसऱ्या युगांत दर्शन देऊं नये असें बरोबर दिसतें का ? काय म्हणतां मुळींच दिसत नाहीं, बरोबर आहे. असें जर आपल्यासारख्या अल्प बुद्धच्या मनुष्यांना वाटतें तर अतिशय दयाळू, अतिशय न्यायी, अतिशय बुद्धिवान् अशा देवरायाला असा पक्षपात मुळींच आवडावयाचा नाहीं हें सांगायालाच नको. बाळांनों, तुम्हीं संतचरित्रें वाचली असतीलच ? काय म्हणतां नाहीं वाचलीं, हरकत नाहीं. माझ्या प्रिय मित्रांनों, पुढें केव्हांतरी याच कलियुगांत झालेल्या संतांची चरित्रें मी तुम्हांला सांगेन. त्या संतांना देवानें दर्शन दिलें. फार लांब कशाला ? आपले प्रेमळ साधु तुकोबाराय यांच्याशीं किती तरी वेळां देवानें हितगुज केलें. बाळांनो, तुम्हांला बऱ्याच सुट्या मिळतात होय ना ? त्या सुट्या तुम्हीं कशा घालवितां ? काय म्हणतां विटीदांडू खेळून व पत्त्यांचे डावचे डाव झिजवून ? बाळांनों, एकवेळ विटीदांडू, खो खो, असले शरीराला सडकून मेहनत देणारे खेळ खेळलेत तर चांगले. पण बाळांनों, सोंगट्या, पत्ते, असले बैठे खेळ लहान मुलांना योग्य नाहीत, त्यांत व्यायाम होत नाहीं, त्यांनीं चलाखी येत नाहीं, त्यांनी प्रकृति सशक्त होत नाहीं. यासाठी नेहमी विटीदांडू, खोखो, लगोऱ्या, क्रिकेट, फुटबॉल, आट्या- पाट्या असले शरीराला कणखर व सशक्त बनविणारे खेळ खेळा. पण बाळांनों, सर्वच सुट्या खेळांत घालविणें बरोबर नाहीं. कांहीं सुट्या आपण आपल्या गावापासून फार दूर नसतील अशीं साधुपुरुषांनीं पवित्र केलेलीं क्षेत्रें पाहाण्यांत घालवाव्या हे चांगलें. बाळांनों, अशीं पुण्यस्थळें अथवा क्षेत्र म्हटली म्हणजे तुकोबारायांचें देहू, ज्ञानेश्वरमहाराजांचें